भारतात आला नवीन शक्तिशाली महासंगणक, ही आहेत वैशिष्ट्ये

आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या विश्वातील शक्तिशाली महासंगणक DGX-2 भारतात आला आहे. जोधपूर स्थित आयआयटी मध्ये तो उपयोगात आणण्यात येणार आहे. यामुळे भारतात आर्टिफिशल इंटेलिजन्स प्रशिक्षणासाठी बळ मिळणार आहे.

आयआयटी जोधपूर मधील कॉम्प्युटर विभागाचे अध्यक्ष डॉ.गौरव यांनी सांगितले की, “आपल्या प्रकारातील हा जगातील सर्वात गतिमान आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) ऍप्लिकेशन्ससाठी सर्वात शक्तिशाली महासंगणक आहे, जो पहिल्यांदाच भारतात आला आहे. हा महासंगणक जोधपूर आयआयटी मधील एका विशेष प्रयोगशाळेत लावण्यात आला आहे.

२.५ कोटी आहे किंमत

डॉ.हरित यांनी सांगितले की, जवळपास २.५ कोटी रुपयांची गुंतवणूक असणाऱ्या या सुपर कॉम्प्युटरच्या ताकतीचा अंदाज यावरूनच लावता येईल की यामध्ये १६ विशेष GPU कार्ड लावण्यात आले आहेत. त्या प्रत्येक कार्डची क्षमता ३२ GB आहे. याची रॅम ५१२ GB आहे. त्यांनी असे सांगितले की, साधारण कॉम्प्युटरची क्षमता केवळ १५० ते २०० वॅट असते, मात्र या सुपर कॉम्प्युटरची क्षमता १०००० वॅट आहे.

दुप्पट क्षमतेने परिपूर्ण

DGX-2 सुपर कॉम्प्युटर पहिल्यांदा देशात आला आहे. याची क्षमता पहिल्या व्हर्जनच्या जवळपास दुप्पट आहे. मोठ्या स्तरावर समजून घ्यायचे झाले तर DGX-1 ने जे काम करण्यास १५ दिवस लागत होते ते काम DGX-2 ने करण्यास केवळ दीड दिवस लागणार आहे. जवळपास १५० किलो वजन असणाऱ्या या सुपर कॉम्प्युटरची इंटर्नल स्टोरेज क्षमता ३० TB आहे.

आयआयटी जोधपूर आणि अमेरिकेतील सुपर कॉम्पुटर कंपनी नवीडिया यांच्यामध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रात संशोधनासाठी दोन वर्षांचा करार करण्यात आला आहे, त्या करारांतर्गत हा सुपर कॉम्प्युटर इथे आणण्यात आला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *