मैनचेस्टरला झाला होता २० वर्षा अगोदर भारत पाकिस्तान सामना, बघा काय झाले होते…

भारत पाकिस्तान सामना हा क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय सामना म्हणून ओळखल्या जातो. करोडो लोक हा सामना बघतात. काल विश्व चषकात भारत पाकिस्तान सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली. भारत पाकिस्तान यांच्यात विश्वचषकात होणारा सामना म्हणजे एकप्रकारे क्रिकेटच्या मैदानात युद्धच असते.

भारत पाकिस्तान सामन्याचा इतिहास सांगतो कि विश्वचषकात भारत पाकिस्तानला नेहमीच धूळ चारतो. आज पासून वीस वर्षा अगोदर भारत पाकिस्तान याच क्रिकेट मैदानावर समोरासमोर आले होते. १९९९ च्या विश्व चषकातील हा सामना होता. या सामन्याबद्दल जाणून घेऊया खासरेवर..

कर्णधार होते मोहम्मद अझरुद्दीन-

काल झालेला सामना विश्वचषकाच्या इतिहासात हा भारत पाकिस्तानचा ७ वा सामना होता. अझरुद्दीन कर्णधार असताना हा सामना झाला होता. टॉस जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात भारताने ५० षटकात २२७ धावा बनवल्या होत्या. आणि भारताच्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४५.३ षटकात फक्त १८० धावावर बाद झाला होता.

व्यंकटेश प्रसादच्या बॉलिंगने हि कमाल तेव्हा भारताने केली होती. या सामन्यात राहुल द्रविडने ६१ आणि कप्तान अझरूद्दीन ने ५९ धावांची शानदार खेळी खेळली होती. आणि पाकिस्तान कडून इंजमाम उल हक याने ४१ धावा बनवल्या होत्या. व्यंकटेश प्रसाद याने ५ विकेट आपल्या बॉलिंगने मिळविल्या होत्या आणि ९.३ ओव्हर मध्ये २.८७ इकोनॉमी रेट मध्ये २७ धावा दिल्या होत्या.

यामध्ये दोन मेडन ओव्हर देखील त्यांनी टाकले होते. कमी स्कोर असून व्यंकटेश प्रसादच्या या बॉलिंग मुळे हा सामना भारताला जिंकता आला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *