भारत पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल?

भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान मँचेस्टर येथे सुरु असलेल्या सामन्यात भारतीय संघाने ३३६ धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी जबरदस्त १३६ धावांची सुरुवात करून दिली. केएल राहुल सेट झाल्यानंतर ५७ धावांवर बाद झाला. रोहित शर्माने भारताकडून १४० धावांची शतकी खेळी खेळली.

रोहितला कर्णधार विराट कोहलीने चांगली साठी दिली. कोहलीने सुरुवातीला थोडा वेळ मैदानात व्यतीत केला त्यानंतर त्याने आक्रमक रूप धारण केले आणि ७७ धावांची खेळी खेळली. पंड्याने देखील चौथ्या क्रमांकावर येऊन एक छोटी पण महत्वपूर्ण २६ धावांची आक्रमक खेळी खेळली. या सामन्यावर पावसाचे सुरुवातीपासूनच सावट होते.

४६ व्या ओव्हरमध्ये पावसाने मॅचमध्ये बाधा आणली खरी पण थोड्याच वेळात पाऊस बंद झाला आणि सामना सुरु झाला. त्यानंतर भारतीय संघाने ३३६ धावांपर्यंत मजल मारली.

पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय होईल?

इंग्लंडमधील मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात (old trafford stadium) हा सामना होत असून पावसाने या सामन्यात एकदा बाधा आणली आहे. अवघ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या या सामन्यात कोण बाजी मारणार याचीच चर्चा जगभरात सुरु आहे. पाऊस येऊ नाही यासाठीच सर्वजण प्रार्थना करत आहेत.

एक इनिंग तर पूर्ण झाली आहे आता पाकिस्तानची फलंदाजी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. जर पावसामुळे कदाचित हा सामना रद्द झाला तर कोणत्या संघावर काय परिणाम होईल जाणून घेउया.

भारतीय संघ सध्या ५ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. विश्वचषकाच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यातील ४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारतीय संघाविरुद्ध त्यांचा पराभव झाला होता. यंदा प्रत्येक संघाला ९ सामने खेळायला मिळणार आहेत. गुणतालिकेत पहिल्या चार क्रमांकावर असणारे संघ बाद फेरीत प्रवेश करतील.

भारतीय संघाने खेळलेल्या ३ सामन्यात २ सामने जिंकले आहेत तर एक सामना रद्द झाला आहे. भारताचा आणखी एक सामना पावसामुळे रद्द झाला, तर भारताला १ गुण मिळेल आणि भारताची गुणसंख्या ६ होईल. तसेच आज भारताने विजय मिळवला तर भारताला दोन गुण मिळतील. आणि भारताचे गुण ७ होतील. तसेच भारताचे पुढचे सामने बांग्लादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तानसोबत होणार असल्याने भारताला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे भारत पुढच्या एक किंवा दोन सामन्यात उपांत्य फेरीत धडक मारेल.

सामना रद्द झाल्यास पाकिस्तानसाठी कठीण परिस्थिती होणार आहे. पाकिस्तानने विश्वचषकात चार सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ एका सामन्यात विजय झाला आहे तर दोन सामन्यात पराभव झाला. एक सामना रद्द झाला. त्यामुळे पाकिस्तानच्या केवळ ३ गुण आहेत आणि गुणतालिकेत पाकिस्तानचा क्रमांक नव्व्या स्थानावर आहे. जर आजचा सामना देखील रद्द झाला तर त्यांचे एकूण चारच गुण होतील. त्यामुळे जर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल, तर त्यांना पुढील सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *