रोहित शर्माने नवीन जोडीदारासोबत केली शतकी भागीदारी! भारताची धडाकेबाज सुरूवात..

मॅंचेस्टर येथे सुरु असलेल्या भारत पाकिस्तान सामन्यात भारताने शानदार सुरुवात केली आहे. साऱ्या विश्वकरंडाकातील सर्वांत जास्त हाय व्होल्टेज सामन्याला पाकिस्तान संघाने नोणेफेक जिंकून सुरवात केली. कर्णधार सर्फराज अहमदने नाणेफेक जिंकताच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर चाहत्यांच्या तुडुंब गर्दीत सामन्याला सुरवात झाली. भारतीय संघाने शिखर धवनच्याऐवजी संघात विजय शंकरला स्थान दिले आहे. रोहित शर्मासह सलामीला लोकेश राहुल उतरेल तर गोलंदाजीमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेला नाही. पाकिस्तानने शादाब खानला संघात स्थान दिले आहे.

या सामन्यात टॉस पाकिस्तानने जिंकला आणि त्यांनी अपेक्षेप्रमाणे बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय उलटताना दिसत आहे. कारण रोहित शर्मा आणि त्याच्यासोबत पहिल्यांदाच ओपनिंग ला आलेल्या केएल राहुलने भारताला धडाकेबाज सुरुवात करून दिली आहे. या सामन्यात भारताचा फॉर्म मध्ये असलेला शिखर धवन खेळात नसल्याने भारताची सुरुवात कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

पण रोहित शर्माने नवीन जोडीदारासोबत भारताला दमदार सुरुवात करून दिली आहे. रोहित आणि केएल राहुलने भारताला शतकी भागीदारी करत दमदार सुरुवात करून दिली आहे.

रोहीने आपला फॉर्म राखत या सामन्यातही वेगवान अर्धशतक झळकावले आहे. रोहितने या विश्वचषकात तीन सामन्यात तिसऱ्यांदा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले होते. तर राहुलनेही आपले अर्धशतक झळकावले आहे.

पाकिस्तानचा टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय एकप्रकारे फसलेला दिसत असून भारताला याचा फायदाच झालेला दिसत आहे. विशेष म्हणजे भारताने आतापर्यंत विश्वचषकात ६ वेळा पाकिस्तानला धूळ चारली आहे.

भारतीय संघाने २२ ओव्हरमध्ये बिना बाद १२३ धावा केल्या आहेत. त्यामध्ये रोहित ६९ धावांवर नाबाद आहे तर राहुल हा ५१ धावांवर नाबाद आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *