आश्चर्यकारक असे धान्य आहे क्विनोआ, आरोग्यासोबत सौंदर्यासाठीही उपयुक्त

भारतात मागच्या काही वर्षांपासून एक आश्चर्यकारक असे क्विनोआ (Quinoa) नावाचे धान्य अचानक लोकप्रिय झाले आहे. तेव्हा पासून अनेक लोकांनी क्विनोआ आपल्या रोजच्या भोजनात सामील करायला सुरुवात केली आहे. जाणून घेऊया या क्विनोआची खासियत काय आहे…

क्विनोआला भारतात किनवा या नावानेही ओळखले जाते. या उत्कृष्ठ अशा धान्यामध्ये असे अनेक पोषक घटक आहेत, जे अनेक प्रकारच्या घटक रोगांपासून आपल्या शरीराचे रक्षण करतात. क्विनोआला आपण सकाळच्या नाश्ता किंवा दुपारच्या भोजनात सामील करू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही त्याचं सॅलेड, पोहे, उपमा किंवा चपाती बनवूनही खाऊ शकता. याचे सेवन करण्याने पूर्ण दिवसभरात शरीराला आवश्यक असणारी पोषकतत्वे मिळून जातात. त्यामुळे दिवसातून कमीत कमी एकदा हे अवश्य खाल्ले पाहिजे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याचा समतोल ठेवण्यासाठी क्विनोआ एक आरोग्यदायक अन्न आहे.

क्विनोआ हा एक धान्याचा प्रकार असून दिसायला डाळीसारखे असते. दक्शीन अमेरिकेतील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. याचा योग्य उच्चार “किनु-आ” असा आहे. ज्या भागात पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी आहे अशा ठिकाणी क्विनोआची शेती केली जाते. असे म्हटले जाते की इतर धान्यासोबत तुलना केल्यास क्विनोआ हे सर्वात पौष्टिक आणि चविष्ठ आहे. सर्वांनाच याची चव आवडते. या कारणामुळेच अत्यंत कमी काळात क्विनोआ भारतात लोकप्रिय झाले. कुठल्याही सुपरमार्केट किंवा फूड आउटलेटमध्ये क्विनोआ तुम्हाला सहजतेने मिळेल. जर मिळत नसेल तर तुम्ही ते ऑनलाईनही मागवू शकता.

अमेरिकेत क्विनोआचा उपयोग प्रामुख्याने केक बनविण्यासाठी केला जातो, कारण क्विनोआ ग्लूटेन फ्री असते. तसेच यात अनेक प्रकारचे अमिनो आम्ल असतात. क्विनोआला फायबर, झिंक, मॅग्नेशियम, व्हिटामिन इ यांचा उत्कृष्ठ स्रोत मानले जाते. आपल्या शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी क्विनोआ फायदेशीर आहे. क्विनोआ काळ्या, शुभ्र आणि लाल अशा तीन रंगांमध्ये आढळते. जाणून घेऊया पर्यटकांचे महत्व –

१) शुभ्र क्विनोआ – शुभ्र रंगाचा क्विनोआ इतर क्विनोआच्या तुलनेत जगात सर्वाधिक प्रमाणात आढळतो. याला हस्तिदंताच्या नावानेही ओळखले जाते. याची खासियत आहे की, इतर क्विनोआच्या तुलनेत याला शिजायला कमी वेळ लागतो.

२) लाल क्विनोआ – लाल रंगाचा क्विनोआ जास्त करुन सॅलेड म्हणून वापरला जातो. त्याला याच रूपात लोकांमध्ये पसंत केले जाते. इतर क्विनोआच्या तुलनेत शिजत असताना हा आपला आकार जास्त प्रमाणात बदलतो.

३) काळा क्विनोआ – काळ्या रंगाचा क्विनोआ इतर धान्यांच्या तुलनेत गोड असतो. शिजल्यानंतर हा आपली मूळची चव बदलत नाही. हा क्विनोआ शिजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो. लाल आणि शुभ्र क्विनोआच्या तुलनेत याचा वापर थोडा कमीच होतो.

क्विनोआचे आरोग्यदायक फायदे

क्विनोआ आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतो, त्यामुळे हृदयासंबंधी आजार कमी होतात. क्विनोआ सांधेदुखीच्या आजारात फायदेशीर आहे. आपल्या शरीरात नसणारी आणि निसर्गातही मुबलकच आढळणारी ९ प्रकारची अत्यावश्यक अमिनो आम्ल क्विनोआमधून शरीराला मिळतात. ते हाडांचा ठिसूळपणाही कमी करतात.

रोजच्या जेवणातील क्विनोआ कॅन्सरला दूर ठेवतो. शरीरातील वेगवगेळ्या भागांना येणारी सूज कमी करण्यातही ते उपयुक्त आहे. मधुमेहाच्या रोगात क्विनोआ शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करते. याशिवाय ऍनिमिया, वाढलेले वजन, चरबी, त्वचासंबंधी आजार, चेहऱ्यावरील निस्तेजपणा, केसांचे रोग यावरही क्विनोआ उपयुक्त आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *