वर्ल्डकपमधील पावसामुळे रद्द होत असलेल्या सामन्यांवरील हे मिम्स बघून हसून पोट दुखेल!

इंग्लड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये सध्या सामान्यांपेक्षा जास्त पावसाचीच चर्चा सुरू आहे. पावसामुळे बरेच सामने रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. पावसाचा सर्वात जास्त फटका श्रीलंका संघाला बसला आहे. श्रीलंका संघाचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. भारतीय संघाला देखील पावसाचा फटका बसला असून न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाला होता.

भारताचा आता पाकिस्तानसोबत उद्या(ता. १६) सामना होणार आहे. या सामन्यावर देखील पावसाचे सावट आहे. मँचेस्टरमध्ये हा सामना उद्या रंगणार आहे. पावसामुळे अनेक सामने रद्द होत असल्याने आयसीसीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. सामन्यांचे नियोजण चुकीचे केल्याचे क्रिकेटप्रेमींची भावना आहे.

१३ तारखेला भारत आणि न्यूझीलंड सामना रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला होता. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना देखील रद्द झाला होता. त्यामुळे चाहते प्रचंड नाराज आहेत. पण लोकांनी मिम्सच्या माध्यमातून आपली सर्व खुन्नस काढली असून सोशल मीडियावर देखील मिम्सचा पाऊस पडला आहे.

हे काही निवडक मिम्स बघून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही-

प्रियांका चोप्राच्या ड्रेसनेच स्टेडियम कव्हर केले आहे येथे तर.

येथे तर पाण्यातच मॅच खेळताना दाखवली आहे-

या ट्विटमध्ये तर गुणतालिका दाखवली असून त्यात पाऊस आघाडीवर असल्याचे दाखवले आहे-

येथे तर हद्दच केली राव. थेट ट्रॉफीलाच छत्री लावण्याचा पराक्रम करून टाकला आहे-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *