भारताचा हा खेळाडू पोहोचला इंग्लंडमध्ये, पाकिस्तानविरुद्ध शिखर धवनच्या जागी मिळणार का संधी ?

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या २०१९ च्या वर्ल्ड कप दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात खेळताना भारताचा सलामीवीर डावखुरा फलंदाज शिखर धवन जखमी झाला होता. आस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टरने टाकलेला एक उसळता चेंडू शिखराच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर लागला होता. त्यामुळे शिखरचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे स्कॅन रिपोर्टमध्ये आढळून आले. शिखरने त्या सामन्यात १०९ चेंडूत ११७ धावांची खेळी केली. शिखरला झालेल्या दुखापतीमुळे असे सांगितले जात आहे की त्याला तीन आठवड्यांसाठी संघाच्या बाहेर बसावे लागेल. शिखर आपल्या दुखापतीतून किती लवकर बरा होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो खेळेल की नाही याविषयी शंका आहे.

हा भारतीय खेळाडू पोहोचला इंग्लंडमध्ये

शिखर धवनच्या दुखापतीची बातमी आल्यानंतर त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार या चर्चांनी वेग घेतला आहे. अशा चर्चा सुरु असतानाच धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंत याचा फेसबुकवरील एक स्क्रिनशॉट व्हायरल झाला आहे.

यात ऋषभ पंत याने फेसबुकवर स्वतःचा एक फोटो टाकला असून त्यावर “चहा” असे कॅप्शन देऊन आपले लोकेशन मँचेस्टर, युनायटेड किंग्डम असे टाकले आहे. म्हणजेच ऋषभ पंत इंग्लंडमध्ये पोहोचला असून कदाचित शिखर धवनची दुखापत बरी नाही झाली तर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पंतला संधी मिळू शकते.

रिप्लेसमेंट नाही, कव्हर म्हणून पंतला बोलावले : बीसीसीआय

एका बाजूला ऋषभ पंतला शिखर धवनच्या जागी टीममध्ये घेतले अशा बातम्या मीडियावर दाखवल्या जात असतानाच दुसऱ्या बाजूला बीसीसीआयने मात्र हा दावा फेटाळला आहे. ऋषभ पंतला शिखर धवनच्या जागी खेळण्यासाठी नव्हे, तर कव्हर खेळाडू म्हणून बोलावण्यात आल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. दरम्यान शिखर धवननेही ट्विटरवर एक व्हिडीओ टाकला असून त्याने त्यात म्हटले आहे की,

“तुम्ही अशा स्थितीला आपले वाईट स्वप्न बनवू शकता किंवा याला एक नवी संधी म्हणून त्याचा उपयोग करू शकता. मी बरा व्हावा म्हणून आपण पाठवलेल्या संदेशांबद्दल आभारी आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *