टीम इंडियाचा धडाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचे या तरुणीसोबत जुळले अफेअर?

क्रिकेटचं आणि फिल्म इंडस्ट्रीचं नातं तसं जुनंच आहे. आजपर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी बॉलीवूड किंवा टॉलीवूडच्या अभिनेत्रींसोबत संसार थाटला आहे. अगदी शर्मिला टागोर-पतौडींपासून हरभजन-गीता, विराट-अनुष्का पर्यंत अनेक जोडपे विवाहबंधनात अडकले आहेत. हे काही जोडपे विवाहबंधनात अडकले असले तरी अनेकांचे अफेअर बॉलीवूडमधील अभिनेत्रीसोबत होते.

अगदी नुकताच निवृत्ती घेतलेला युवराज सिंग आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे देखील नाव अभिनेत्रीसोबत जोडलेले होते. अशातच आता एका नव्या अफेअरची चर्चा सध्या चालू झाली आहे. भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रित बुमराहची विकेट पडल्याची चर्चा सध्या जोरात चालू आहे. बुमराहचे एका अभिनेत्रीशी प्रेम जुळल्याची चर्चा आहे.

टीम इंडियाचा धडाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याचं दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरमसोबत अफेअर असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जसप्रीत बुमराहने मागील २ वर्षात दमदार कामगिरी करत आपले वेगळे स्थान संघात निर्माण केले आहे.

आजपर्यंत अनेकदा स्टेडियममध्ये माझ्याशी लग्न कर असे फलक त्याच्यासाठी झळकले आहेत. २५ वर्षीय जसप्रीत मात्र प्रेमम सिनेमातील अभिनेत्रींसोबत प्रेमात पडल्याचं बोललं जात आहे. अनुपमा ‘प्रेमम’ या मल्ल्याळम चित्रपटामुळे अनुपमा प्रकाशझोतात आली. जसप्रीत आणि अनुपमा यांनी ट्विटरवर एकमेकांना फॉलो करायला सुरुवात केल्यानंतर चाहत्यांच्या माना वळल्या. अनुपमाने मात्र या अफवांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

बुमराहचं नाव यापूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री राशी खन्नासोबतही जोडलं जात होतं. मात्र तिनेही या अफवा धुडकावून लावल्या होत्या. बुमराह सध्या इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बुमराहने चमकदार कामगिरी करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता मैदानाबाहेर जसप्रीतची जोडी कोणाबरोबर जमणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *