‘या’ पाच कारणांमुळे इच्छा नसतानाही महिला रिलेशनशीपमध्ये राहतात!

भारतामध्ये पूर्वी बालविवाहाची प्रथा होती. ती प्रथा जरी बंद झाली असली तर भारतात अजूनही वय झालं कि लवकरात लवकर लग्न उरकून टाकण्याची लोकांची मानसिकता आहे. वयात आलं कि लवकरात लवकर लग्न करावं यासाठी घरच्यांचा आग्रह असतो. मुलगी वयात आली कि तीच लग्न करण्याची घाई असते तर मुलगा कमावता झाला कि त्याचं लग्न करण्याची घाई असते.

भारतात प्रेमविवाह करणे हे मोठं कठीण काम आहे. प्रेमविवाह केला तरी ते मुलीच्या घरचे किंवा मुलाच्या घरचे स्वीकारतील असे खूप कमी वेळेस होते. प्रेमविवाहात अनेक अडचणींचा सामना भारतात जोडप्याना करावा लागतो. लग्न झाल्यानंतरही अनेकदा अडचणी येतात. नात्यात दुरावा देखील येतो. पण अशावेळी नातं टिकवण्यासाठी दबाव असतो. महिला आणि पुरुष दोघांवरही हा दबाव असतो.

लग्नानंतर जास्त अडचणींचा सामना महिलांना करावा लागतो. त्यांना कितीही अडचणी असल्या तरी नातं टिकवण्यासाठी शेवटी तडजोड करावीच लागते. भारतातील महिला देखील तडजोड करून नातं टिकवतात देखील. नवरा बायकोच्या नात्यात प्रेम आणि विश्वास महत्वाचा असतो. ते नसेल तर नातं टिकवणं जास्त अवघड होतं.

खासरेवर पाच गोष्टी बघूया ज्यामुळे महिला इच्छा नसतानाही रिलेशनशिप मध्ये राहतात-

संभ्रम-

नात्यात अडचण असली तरी महिला या नात्याबद्दल संभ्रमात असतात. त्यांना जोडीदारामध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा असते. तसेच सोडून गेल्यास त्रास देखील होईल हि भीती मनात असते. महिलांना रिलेशनशिपमध्ये जोडीदाराकडून त्रास होत असला तरी त्या आज न उद्या त्यामध्ये बदल होईल, सुधारणा होईल या अपेक्षेने जगत असतात. पण या विचारात त्यांना घुसमटत आयुष्य जगावं लागतं.

समाजाची भीती-

लोक काय म्हणतील हा भारतात सर्वात मोठा रोग आहे. या भीतीनेच महिला नात्यात त्रास होत असला तरी सहन करतात. समाजाच्या भीतीने त्या आपल्याला होणारा त्रास कोणाला सांगत देखील नाहीत.

भविष्याचा विचार-

आपल्या मुलांचं भविष्य हे महिलांना स्वतःच्या अडचणींपेक्षा जास्त महत्वाचं वाटतं. या गोष्टीमुळे त्यांना अडचणी सहन करून नातं निभवाव लागतं. पालक म्हणून मुलांची जबाबदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे. अशात जर महिलांची गोष्ट असेल, तर अडचणी आणखी वाढतात.

कुटुंबाचा दबाव-

नात्यांमध्ये नातेवाईक देखील महत्वाची भूमिका बजावत असतात. जर महिला नात्यात आनंदी नसेल आणि तिला त्यातून बाहरे पडायचं असेल, तर तिला तिचे नातेवाईक तसं करण्यापासून रोखतात. तिला अॅडजस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा कुटुंबातील लोक समाज, कुटुंब आणि मुलांच्या नावाखाली नातं टिकवून ठेवण्यासाठी दबाव टाकतात.

आर्थिक स्थिती-

महिला या आर्थिक बाबीत सक्षम असतीलच असे नसते. अनेकदा आर्थिक बाबीत सक्षम नसल्यामुळे त्यांना जोडीदारावरच अवलंबून राहावं लागतं. अशात त्या रिलेशन तोडण्याचा विचार देखील करू शकत नाहीत. ते टिकवूनच जगणे हा पर्याय त्यांच्यासमोर असतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *