मंत्रिमंडळाच्या विस्तारात या चेहऱ्यांना मिळणार संधी तर यांचा होणार पत्ता कट !

फडणवीस सरकार मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि अनेकांना उस्तुकता लागली आहे कि आता कोणत्या नवीन चेहऱ्यांना या वेळेस मंत्रिमंडळात स्थान मिळेल. या बाबत आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार खालील काही चेहऱ्यांना मंत्री होण्याची संधी मिळणार आहे.

राज्यात सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतेय. मात्र याआधीच मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार, हे आता निश्चित झालंय. रविवारी, १६ जून रोजी सकाळी ११ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी राजभवनात पार पडणार आहे. तर बघूया आता मंत्रीमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार आहे.

या नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी

आत्ताच कॉंग्रेसचा राजीनामा दिलेले आ. राधा कृष्ण विखे पाटील यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार आहे हे नक्की झाले आहे. यानंतर आशिष शेलार यांची सुध्दा समावेश होण्याची संभावना आहे. आ. जय दत्त क्षीरसागर बीड, अनिल बोंडे अमरावती , तानाजी सावंत यवतमाळ, अविनाश महातेकर मुंबई, अतुल साळवे औरंगाबाद, संजय बेगडे मावळ, संजय कुटे शेगाव, सुरेश खाडे सांगली आणि प्रा. उईके कळंब यवतमाळ यांना चान्स मिळण्याची शक्यता आहे.

हे चेहरे पडणार बाहेर

मागील काही दिवसापासून वादात सापडलेले आ. प्रकाश मेहता यांचे पद जाण्याची शक्यता आहे. तसेच आ. राज कुमार बडोले,आ. विष्णू सावरा, आ. प्रवीण पोटे आणि आ. दिलीप कांबळे यांचे पद जाणार आहेत हि माहिती मिळाली आहे. रामदास आठवले यांच्या रिपाइंला एक मंत्रिपद मिळू शकणार आहे. आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरिश अत्राम यांनाही घरी पाठवण्यात येणार आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *