गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे भाकीत, हे दोन संघ खेळणार वर्ल्ड कपची फायनल मॅच

यंदा इंग्लंड देशात क्रिकेट वर्ल्ड कप सुरू आहे. २०१९ चा वर्ल्ड कप कोणती टीम जिंकेल हा सगळ्यांच्याच औत्सुक्याचा विषय बनला आहे. आयपीएल आणि मागच्या सहा महिन्यातील विविध खेळाडूंचा परफॉर्मन्स बघता India, England, Austrelia, South Africa, Newzealand आणि West Indies हे संघ वर्ल्ड कपचे दावेदार असू शकतात.

आयपीएल मध्ये जसा सर्वानी आपापला आवडता संघ निवडला होता, तसाच आता वर्ल्ड कपसाठीही सर्वजण आपापले संघ निवडत आहेत. Google चे कार्यकारी प्रमुख सुंदर पिचाई यांनीही त्यांचा आवडता संघ निवडला आहे. एवढेच नाही तर वर्ल्ड कपची फायनल मॅच कोणत्या दोन टीममध्ये होईल याचे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे.

कोण आहेत सुंदर पिचाई ?

सुंदर पिचाई (पिचाई सुदंरराजन) हे भारतीय वंशाचे उद्योगपती असून सध्या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते मूळचे तामिळनाडूचे राहणारे असून त्यांनी खडगपूरच्या आयआयटी मधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी अमिरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मधून एमएस आणि पेनसिल्वेनियाच्या व्हार्टन स्कुल मधून एमबीए केले. २००४ साली ते गुगलमध्ये नोकरीस लागले. गुगलमध्ये गुगल ड्राइव्ह, गुगल क्रोम आणि क्रोम ऑपरेटिंग सिस्टीमच्या निर्मितीची जबाबदारी समर्थपणे पार पाडल्याबद्दल ११ वर्षांच्या सेवेनंतर त्यांना गुगलच्या सीईओ पदावर नेमण्यात आले.

सुंदर पिचाई यांनी काय भाकीत केले ?

सुंदर पिचाई यांच्या भाकितानुसार २०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल मॅच भारत आणि इंग्लंड या दोन टीममध्ये होईल. न्यूझीलँड आणि आस्ट्रेलियाची टीम सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये असल्यामुळे या टीमसुद्धा ऐन वेळेला सगळे चित्र पालटू शकतात.

मात्र सुंदर पिचाई यांची इच्छा आहे की, विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या भारतीय संघाने फायनल मॅचमध्ये इंग्लंडला हरवून वर्ल्ड कप जिंकावा. USIBC आयोजित India Ideas Summit मध्ये त्यांनी ही इच्छा व्यक्त केली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *