अशा प्रकारे स्वरराज ठाकरे बनले राज ठाकरे !

महाराष्ट्र आणि मराठी भाषेची अस्मिता केंद्रस्थानी ठेवून आपल्या राजकारणाची धोरणे आखणारे राज ठाकरे तरुणांमध्ये लोकप्रिय असणारे राजकारणी आहेत. त्यांच्या अनेक भूमिका वादग्रस्त असल्या तरी त्यांचे मुद्दे करण्यासारखे असतात. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचे ब्रीदवाक्य घेऊन त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल सुरु आहे.

महाराष्ट्रात गुगलवर सर्वाधिक सर्च केले जाणारे नाव म्हणजे राज ठाकरे असे त्यांच्याबद्दल सांगितले जाते. मात्र राज ठाकरेंचे मूळ नाव स्वरराज ठाकरे असल्याचे आपल्यापैकी कितीजणांना माहित आहे ? चला तर जाणून घेऊया कसे झाले स्वरराज ठाकरेंचे मराठीहृदयसम्राट राज ठाकरे !

राज ठाकरेंच्या दुसऱ्या बारशाची गोष्ट

गतवर्षी बालदिनाच्या दिवशी एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या “ऐसपैस गप्पा राजकाकांशी” या कार्यक्रमात राज ठाकरेंनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग सांगताना स्वरराजचे राज असे बारसे कसे झाले हा किस्सा सांगितला. राज सुरुवातीच्या काळात स्वरराज ठाकरे अशा नावाने व्यंगचित्रे काढत असत. त्यांच्यातील व्यंगचित्रकाराच्या करिअरची सुरूवात स्वरराज याच नावाने झालती. परंतु ७-८ महिन्याच्या काळातच काका बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना आपले नाव बदलायला सांगितले.

बाळासाहेब बोलले की, त्यांनी त्यांच्या व्यंगचित्र क्षेत्रातल्या करिअरची सुरूवात “बाळ ठाकरे” नावाने केलेली. त्यामुळे राजने सुद्धा स्वरराज ऐवजी राज ठाकरे नावानेच व्यंगचित्रे काढायला हवीत. तेव्हा झाले स्वरराज ठाकरेंचे राज ठाकरे ! बाळासाहेबांनीच माझं दुसरं बारशे केले असे राज ठाकरे सांगतात.

स्वरराज हे नाव कसे ठेवले होते ?

राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे संगीतकार होते. त्यांनी आपल्या घरातल्या सगळ्यांची नावे संगीतावरूनच ठेवली होती. राज यांच्या आईचे नाव मधुवंती तर बहिणीचे नाव जयजयवंती ठेवले होते. त्यांना ज्यावेळेस मुलगा झाला त्यावेळेस आपला मुलगा संगीताच्या क्षेत्रात काहीतरी करेल असं त्यांना वाटायचं. याच भावनेतून त्यांनी आपल्या मुलाचे पाळण्यातील नाव संगीतातील स्वरांशी संबंधित म्हणजेच स्वरराज असे ठेवले. बाळासाहेबांनी पुढे त्यांना राज हे नाव दिले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *