हिंदीत बोलल्यामुळे ट्रोल केलेल्या चाहत्यांचा अभिनेत्री केतकी चितळेने घेतला धडा! बघा व्हिडीओ..

सोशल मीडियावर कलाकारांना ट्रोल करण्याचे प्रकार काही नवीन नाहीयेत. पण कधी कधी काही चाहते एखाद्यावर टीका करताना आपली सीमा ओलांडतात. असंच काहीसं मराठी अभिनेत्री केतकी चितळेच्या बाबतीत घातले आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ नुकताच पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये तिने आपले सर्व फॉलोअर्स हे मराठी नसून हिंदी इंग्लिश देखील आहेत असे सांगत व्हिडिओमध्ये हिंदीत बोलणार असल्याचे सांगितले होते.

ती हिंदीत बोलत असल्याने तिला अनेकांनी ट्रोल करायला सुरुवात केली. त्यावर तिने तुमचे मराठीचे झेंडे इथे फिरवू नका असे म्हणत हिंदी राष्ट्रीय भाषा असून ती प्रत्येकाला यावी असे मत व्यक्त केले होते.

तिचा हा व्हिडीओ अनेक पेजेसवर शेअर करून तिला मराठीची लाज वाटते म्हणून तिच्यावर टीका करण्यात आली होती. अनेक मोठ्या पेजवर तिचा हा व्हिडीओ पोस्ट केला गेला होता. त्यावर अनेकांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन तिच्यावर टीका केली होती.

तिच्यावर केलेल्या टीकेला तिने आज उत्तर दिले असून या पेजेसचा आणि तिला खालच्या भाषेत ट्रोल करणाऱ्यांचा तिने चांगलाच धडा घेतला आहे. तिच्याबद्दल अनेकांनी वापरलेले शब्द वाचून तुमचीही तळपायाची आग मस्तकात जाईल. मराठीचा अभिमान असायला हवा पण एखाद्या अभिनेत्रीने एखादा व्हिडीओ हिंदी भाषेत केला म्हणून तिला एवढ्या खालच्या भाषेत टीका करण्याचा अधिकार मात्र कोणालाही नाहीये.

बघा केतकीने कशाप्रकारे टीकाकारांचा धडा घेतला-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *