भारत न्युजीलंड सामना पावसामुळे रद्द, जाणून घ्या कोणाचे झाले जास्त नुकसान..

क्रिकेट विश्वचषकातील १८वा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज क्रिकेट स्टेडियम येथे आज खेळवल्या जाणार होता. हा सामना दोन्ही टीम करिता महत्वाचा होता. दोन्हीही संघ आत्ता पर्यंतच्या सर्व सामन्यात अपराजित आहे. भारताने आत्तापर्यंत दोन्हीही सामने जिंकले आहेत तिथे न्यूझीलंडने सुरवातीचे तिन्हीही सामने जिंकलेली आहेत.

पावसामुळे हा क्रिकेटचा सामना झाला रद्द

या सामन्याकरिता अनेकजन प्रतीक्षा करत होते परंतु पाणी थांबण्याचे संकेत न दिसल्याने हा सामना रद्द करण्यात आला. पावसामुळे या सामन्यात toss देखील झाला नाही त्यामुळे विना toss हा सामना रद्द करण्यात आला आहे.

या संघास झाले मोठे नुकसान

या सामन्यात नुकसान भारतीय संघाचे झाले आहे कारण या सामन्यात सर्वाचा कौल हा भारतीय संघाकडे होता आणि त्यांचा आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध परफोमन्स सर्वाचा कल भारताकडे जास्त झुकलेला होता. क्रिकेट मधील अनेक दिग्गजाचे म्हणणे होते कि भारत हा सामना अलगद आपल्या बाजूने ओढून घेणार आहे. परंतु पाण्यामुळे भारताच्या या स्वप्नावर पाणी फिरले आणि भारतीय संघास फक्त १ गुणावर समाधान मानावे लागले.

जर हा सामना भारत जिंकला असता तर त्याला न्यूझीलंडच्या बरोबरीत ६ गुण मिळाले असते. आणि नेट रनच्या आधारावर गुणतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आला असता.

या टूर्नामेंट मधील चौथा सामना रद्द

हा या विश्वचषकातील चौथा सामना आहे जो रद्द झाला आहे. या आगोदर श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान होणारा सामना रद्द झाला. तसेच सोमवारी १० जून ला होणारा वेस्ट इंडीज आणि साउथ आफ्रिका हा देखील सामना रद्द झाला होता. आणि या नंतर श्रीलंका आणि बांगलादेश यांच्या दरम्यान होणारा सामना देखील रद्द झाला होता. लगातार रद्द होणारे सामने क्रिकेट प्रेमी करिता एक वाईट बातमी घेऊन येत आहेत.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *