आईच्या दुसऱ्या लग्नानिमित्त मुलाने फेसबुकवर दिल्या भावनिक शुभेच्छा

आई आणि मुलाचे नाते खूप भावनिक असते, ज्याला शब्दात व्यक्त करणे कधीकधी अशक्य असते. एका आईसाठी मुलगा जितका अनमोल असतो, त्याप्रमाणेच एका मुलासाठी त्याची आईसुद्धा तितकीच खास असते. केरळ मधील एका आई अंडी मुलाने अशाच या मायलेकाच्या नात्याचा आदर्श निर्माण केला आहे. मुलाने आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नाच्या निमित्ताने फेसबुकवर एक भावनिक पत्र लिहले आहे, जे प्रत्येकासाठी एक चर्चेचा विषय बनले आहे.

विषय असा आहे की केरळच्या गोकुळ श्रीधर यांनी आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नाच्या निमित्ताने फेसबुकवर मल्याळम भाषेत एक भावनिक पोस्ट लिहली. ती पोस्ट काही वेळातच खूप व्हायरल झाली. आपल्या पोस्टमध्ये गोकुळ श्रीधरने लिहले की, त्याच्या आईने तिच्या पहिल्या लग्नात खूप दुःख झेलली होती. त्याच्या आईला अनेकदा शारीरिक हिंसेचाही सामना करावा लागला आणि आईने हे सर्व आपला मुलगा गोकुळ याच्यासाठी सहन केले.

गोकुळ श्रीधर यांनी लिहले आहे की, “हा माझ्या आईचा विवाह आहे. मी खूप विचार केला की काय अशा प्रकारचे मनोगत लिहणे योग्य ठरेल ? शेवटी हा असा काळ आहे ज्या काळात खूप सारे लोक आजही दुसऱ्या लग्नाचा स्वीकार करू शकत नाहीत. ज्या लोकांच्या नजरेत शंका असेल, जे निर्दयी असतील आणि तिरस्काराचा नजरेने पाहत असतील त्यांनी कृपया इकडे लक्ष देऊ नये. जरी तुम्ही बघितलं तरी काहीही फरक पडणार नाही.

गोकुळ श्रीधर यांचं म्हणणं आहे की, हे मनोगत शेअर करण्यापूर्वी ते खूप संभ्रमात होते. त्यांना असे वाटत होते की त्यांच्या या विचारांना समाजाचा एक वर्ग योग्य रीतीने स्वीकारणार नाही. लवकरच त्यांना या गोष्टीचा अनुभव आला आणि आपल्या भावना इतरांपासून लपवून ठेवण्याची काही आवश्यकता नाही हे जाणवले. यानंतर त्यांनी निर्णय घेतला की, ते आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नाचा आनंद सर्वांसोबत शेअर करणार !

गोकुळ पुढे लिहतात, “एक स्त्री जीने माझ्यासाठी आपलं आयुष्य कुर्बान केलं. आता तिचे स्वप्न पूर्ण करण्याची बारी माझी आहे. माझ्याजवळ सांगण्यासारखं काही नाही. मला असे वाटते की, ही अशी गोष्ट आहे जी लपवून ठेवण्याची काहीही गरज नाही. आई ! तुला वैवाहिक आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा !

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *