या १० मार्गांनी आपणही आपलं म्हणणं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवू शकाल

आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे Facebook, Instagraam आणि Twitter सारख्या Social Media वर चांगलेच कार्यरत असतात. PMO म्हणजेच प्रधानमंत्री कार्यालयात रोजच्या रोज सोशल मिडीयाचा एक अहवाल बनवण्यात येतो. PMO कडून प्रधानमंत्र्यांच्या ट्विटर अकाउंटला टाकलेल्या पोस्टवर आलेल्या जवळपास १५० कमेंट निवडून त्यांची एक लिस्ट काढली जाते. ही कमेंटची लिस्ट थेटपणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पाठवण्यात येते. दैनिक भास्कर मिडीयाकडे याविषयी जवळपास १००० पानांचा अहवाल आहे.

आपल्या प्रधानमंत्र्यांशी कसा संपर्क साधाल ?

आपले गाऱ्हाणं देशाच्या प्रधानमंत्र्यांपर्यंत कसे पोहोचवायचे हा प्रश्न आपल्याला पडत असेल तर आता काळजी करू नका. आम्ही आपल्याला यासाठीचे १० मार्ग सांगणार आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला आपलं म्हणणं मोदींपर्यंत पोहोचवता येईल.

१) सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही प्रधानमंत्र्यांना त्यांच्या कार्यालयीन पत्त्यावर पत्र पाठवु शकता. अहवालातील माहितीनुसार मोदींना देशभरातुन दररोज २००० हुन अधिक पत्र येतात. मोदींचा कार्यालयीन पत्ता – “Web Information Maneger, South Block, Raisina Hill, New Delhi – 110011 Phone Number – 23012312 Fax – 23019545, 23016857. याशिवाय तुम्ही “आदरणीय प्रधानमंत्री, भारत, ७ रेसकोर्स रस्ता, नवी दिल्ली” एवढा पत्ता लिहूनही पत्र पाठवू शकता.

2) आपल्या मनामध्ये कुठली शंका अथवा सूचना असेल जी तुम्हाला प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचवायची आहे, तर www.pmindia.gov.in/en/interact-with-honble-pm/ या वेब अड्रेसवर Register करुन Login करा. पीएम मोदींशी संवाद साधण्यासाठी तयार काण्यात आलेले हे एक अधिकृत पोर्टल आहे.

३) www.mygov.in या वेबसाईटवरती जाऊन तुमच्याकडे असणाऱ्या चांगल्या कल्पना, सूचना प्रधानमंत्र्यांसोबत शेअर करु शकाल.

४) माहिती अधिकाराच्या माध्यमातुन तुम्हाला प्रधानमंत्री महोदयांना तुमचे प्रश्न विचारता येतील. ५) ट्विटरवरती @PMOIndia अथवा @Narendramodi या प्रधानमंत्री कार्यालयाशी संबंधित ट्विटर हॅन्डलला मेन्शन करुन तुमचे म्हणणं सरळ पीएम मोदींपर्यंत पोहचवू शकता. मोदींच्या ट्विटर हॅण्डलला १६ मिलीयनहुन जास्त लोक फॉलो करतात.

६) YouTube च्या द्वारेही आपण आपलं म्हणणं पीएम पर्यंत पोहोचवु शकता. युट्युबवर Narendra Modi’s Youtube chanel असे सर्च करुन आपणास त्यावर आपले संदेश पाठवता येतील. ७) फेसबुकवरही नरेंद्र मोदींच्या व्हेरीफाईड पेजवर अथवा fb.com/pmoindia या फेसबुक आयडीवर जाऊन आपण मोदींशी कॉन्टॅक्ट करु शकाल.

८) जीमेलच्या माध्यमातून narendramodi1234@gmail.com या मोदींच्या अधिकृत ईमेल आयडीवर आपल्या सूचना, म्हणणं अथवा कल्पना सांगू शकता. ९) Instagram वर https://www.instagram.com/narendramodi या वेब अड्रेसवर अथवा LinkedIn वर https://in.linkedin.com/in/narendramodi या वेब अड्रेसवर सुद्धा तुम्ही मोदींना संपर्क करु शकता.

१०) गुगल प्ले स्टोअर वरुन NaMo हे अँड्रॉइड अप्लिकेशन डाउनलोड करुन त्याद्वारेही तुम्हाला प्रधानमंत्र्याशी संपर्क साधता येईल.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *