अमिताभ बच्चनने बिहारच्या शेतकऱ्यांसाठी उचलले ‘हे’ अभिमानास्पद पाऊल!

बॉलिवूडमधील स्टार्स वेगवेगळ्या मार्गांनी समाजसेवा करत असल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो. कुणी भूकंपग्रस्तांना मदत करतात, कुणी अनाथालयांना मदत करतात तर कुणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करतात. बॉलिवूडचा शहनशहा अमिताभ बच्चन यांनीही आपल्या समाजसेवेचे उदाहरण बॉलिवूड कलाकारांसमोर ठेवले आहे. ७६ वर्षांच्या अमिताभ बच्चन यांनी बिहार मधील जवळपास २१०० शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे. याविषयी आपल्या ब्लॉग वर त्यांनी माहिती देताना त्यांनी सांगितले की, दिलेले वचन पाळले !

कसे फेडले कर्ज ?

अमिताभ यांनी सर्वप्रथम बिहारधील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत होते, त्यापैकी २१०० शेतकऱ्यांची निवड केली. निवडलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज ओटीएस म्हणजेच वन टाइम सेटलमेंट प्रणालीच्या माध्यमातून फेडण्यात आले. यापैकी काही शेतकऱ्यांना अमिताभ यांनी त्यांचा बंगला जनक येथे बोलावले होते. वैयत्तिकरित्या मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन नंदा यांच्या हस्ते त्या शेतकऱ्यांना चेक देण्यात आले. अशा प्रकारे अमिताभ यांनी बिहारच्या शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला.

महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशच्या शेतकऱ्यांचे सुद्धा कर्ज फेडले होते

अमिताभ बच्चन यांनी याआधी महाराष्ट्रातील ३५० शेतकऱ्यांचे कर्ज फेडले होते. तसेच मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये उत्तरप्रदेशमधील १३४८ शेतकऱ्यांचाही कर्ज फेडले होते. ती कर्जाची रक्कम जवळपास ४.०५ कोटी सांगितली जाते. त्यासाठी अमिताभ यांनी बँक ऑफ इंडियामध्ये ओटीएस प्रणालीने एकाचवेळी या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज फेडले होते.

शहिदांच्या कुटुंबियांनाही मदत

अमिताभ यांनी शेतकऱ्यांना मदत करत असतानाच ४४ शहिदांच्या कुटुंबियांनाही मदत केली आहे. त्यावेळी त्यांनी सांगितले की, “आपल्या देशासाठी शाहिद होणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांसाठी काहीतरी मदत केल्याने मला खूप समाधान मिळते. शेवटी त्यांनी आपल्यासाठीच आपला जीव गमावलेला असतो.”

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *