सुट्टीत शिमला मनाली मसुरीला चाललाय ? आधी नो एंट्रीचा बोर्ड आणि हि गर्दी बघा !

शहरातील गरमी पासुन वाचण्यासाठी लोक शिमला, मसुरी, नैनिताल आणि मनाली सारख्या थंड हवेच्या ठिकाणी जात असतात. दरवर्षी लाखो पर्यटक या हिल्स स्टेशनवरती उन्हाळ्याच्या सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र यावेळेस शिमला, नैनिताल आणि मनाली येथील पर्यटकांची प्रचंड संख्या पाहता प्रशासनाने नो एंट्रीचा बोर्डच लावून टाकला आहे.

शिमलामध्ये अगोदर पासुनच पाण्याची समस्या सुरु आहे. त्यात भर म्हणजे इथे प्रचंड संख्येने आलेल्या पर्यटकांनाही पाण्याच्या प्रश्नाचा सामना करावा लागत आहे. इथली सर्व हॉटेल्स अगोदरपासूनच ऑनलाईन बुक झालेली आहेत. त्यामुळे इथे आलेल्या पर्यटकांना मुक्कामासाठी हॉटेल मिळण्यात अडचणी आहेत. त्यामुळे त्यांना मोकळ्या हाताने परत जावे लागत आहे. शिमलामध्ये पार्किंगची समस्या खूप मोठी आहे.

नैनितालमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. ईदच्या सुतंतूनानंतर तिथली परिस्थितीही काहीशी शिमलासारखीच आहे. नैनितालच्या ३५ किमी अलीकडे असणाऱ्या काठगोदाम पासुन नैनिताल, भीमताल पर्यंत हजारो पर्यटक ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. खाजगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. शिमलाप्रमाणेच इथेही पार्किंगची समस्यां मोठी आहे.

मागच्या आठवड्यात नैनिताल आणि भीमतालमध्ये तसेच आसपासच्या भागात पावसामुळे मौसम आल्हाददायक झाला आहे. त्यामुळे पर्यटक तिकडे जात आहेत. हे बघता प्रशासनाने पर्यटकांना ३५ किमी अलीकडे काठगोदाम पासुन पुढे येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे पर्यटकांना मोकळ्या हाती परतावे लागत आहे.

पर्यटकांची संख्या वाढल्याने या दिवसात डोंगरभागात पाण्याची समस्या वाढत चालली आहे. हॉटेलचे मालक पर्यटकांकडून मनमानी पद्धतीने पैशांची लूट करत आहेत. यावर प्रशासन काहीही कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही. शिमला, मसुरी, नैनिताल, मनाली, केदारनाथ, ऑली यासारख्या हिल्स स्टेशनवर हॉटेलच्या रात्रीच्या भाड्यात ४०० टक्क्यांची वाढ बघण्यात आली आहे. तसेच ज्या पर्यटकांना खाजगी गाडीने शिमला, मसुरी, नैनिताल आणि मनालीला जाण्याची संधी मिळाली आहे, त्यांना प्रचंड ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *