मौका मौका जाहिरातीला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानी मीडियाने केला कमांडर अभिनंदनचा अवमान

भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ विमान कोसळून भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात सापडले होते. अभिनंदन पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असताना त्यांना चहापाणी वगैरे करण्यात आला. तसेच काही प्रश्नही विचारण्यात आले होते. पाकिस्तानी आर्मीने प्रसिद्ध केलेला या संवादाचा व्हिडीओ त्यावेळी व्हायरल झाला होता. त्यात अभिनंदन यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अभिनंदन म्हणतात की, “मला माफ करा, मी तुम्हाला ते सांगू शकत नाही”

मौका मौका जाहिरातीला उत्तर देण्यासाठी ही जाहिरात

भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट मॅच असेल तर सगळ्यांच्या नजरा तिकडे लागलेल्या असतात. आजपर्यंतच्या विश्वचषकाच्या इतिहासात भारताने पाकिस्तानला नेहमी पराभूतच केले आहे. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच असते तेव्हा टीव्हीवर “मौका मौका” ही जाहिरात हमखास दाखवली जाते. या जाहिरातीतून पाकिस्तानी क्रिकेट फॅनला वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध जिंकल्याचा आनंद साजरा करण्याचा मौका कधी मिळणार असे दाखवण्यात आले आहे.

मात्र आता या मौका मौकाच्या जाहिरातीला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या एका चॅनेलने पाकिस्तान आर्मी आणि अभिनंदन वर्धमान यांच्यातील संवादावरती आधारित एक विनोदी जाहिरात बनवली आहे. इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात १६ जूनला सामना होणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर ही जाहिरात दाखवण्यात येत आहे.

पाकिस्तानी आर्मी आणि अभिनंदन यांच्यात ज्याप्रामणे संवाद झाले त्याप्रमणे या जाहिरातीची रचना आहे. जाहिरातीत हुबेहूब अभिनंदन यांच्यासारखा चेहरा, मिशा आणि वेशभूषा असणाऱ्या ऍक्टरला वर्ल्डकपच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात येतात आणि तो ऍक्टर अभिनंदन प्रमाणेच उत्तर देतो असे दाखविण्यात आले आहे.

काय आहे जाहिरात ?

जाहिरातीत बॅकग्राऊंडला एक व्यक्ती ऍक्टरला प्रश्न विचारतो, “टॉस जिंकला तर काय करणार ?” यावर तो ऍक्टर अभिनंदनाच्या स्वरात उत्तर देतो, “मला माफ करा, मी तुम्हाला ते सांगू शकत नाही.” त्यानंतर परत “अंतिम ११ मध्ये कोण कोण खेळणार” हा प्रश्न विचारण्यात येतो. यावरही तो ऍक्टर “मला माफ करा, मी तुम्हाला ते सांगू शकत नाही” असे उत्तर देतो. पुढे त्याला “चहा कसा आहे” असा प्रश्न विचारण्यात येतो.

यावर ऍक्टर सांगतो “चहा उत्तम आहे.” त्यांनतर त्या ऍक्टरला जायला सांगण्यात येते. पण जाताना ऍक्टर चहाचा कप सोबत घेऊन निघतो, तेवढ्यात त्याला अडवून “एक सेकंद थांबा, कप कुठे घेऊन चाललंय ?” अशा शब्दात टोमणा मारून कप काढून घेण्यात येतो. थोडक्यात यंदा आम्हीच कप आणणार असा संदेश त्या जाहिरातीतून देण्यात आला आहे.

सोशल मीडियावर निषेध

अभिनंदन वर्धमान यांचा अवमान करणाऱ्या पाकिस्तानी मीडियाचा ट्विटरवरील नेटिझन्सने चांगलाच समाचार घेतला. हे वर्ल्ड कपच्या नाहीत, तर चहाच्या कपाचे लायक आहेत अशा शब्दात पाकिस्तानची खिल्ली उडवण्यात आली. अनेकांनी १६ जूनला फादर डे असल्याची पाकिस्तानला आठवण करून दिली. तसेच भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानने भारतासमोर जशी शरणागती पत्करली तशीच १६ जूनच्या क्रिकेट सामन्यातही पत्करताना दिसतील असे मिम्स बनवण्यात आले.

आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य लाईक आणी शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *