या ७ गोष्टी पुरुषांना खजील करतात, यापासून कसे वाचायचे जाणून घ्या

अनेक ठिकाणी पुरुषांना फजितीला समोर जावे लागते आणि तेही काही दैनदिन कारणामुळे कारण कधी अंगाचा वास, शरीरावरील केस, पायाचा येणारा वास इत्यादी प्रकार अनेका सोबत घडतात यासठी तुम्हाला आज खासरेवर काही सोपे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची सार्वजनिक ठिकाणी फजिती होणार नाही.

लठ्ठपणा

वजन वाढण्याच्या समस्येने अनेक भारतातील लोक ग्रासलेले आहेत. दैनदिन आयुष्यातील तणाव अनियंत्रित जीवनशैली इत्यादी गोष्टी वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. याच्यापासून वाचण्याकरीता रोज कारले किंवा दुधी (लौकी) चा ज्यूस पिल्याने metabolism वाढतो आणि त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यात आणि कमी करण्यास मदत होते.

अंगावर येणारे केस

शरीर आणि चेहऱ्यावर नको त्या ठिकाणी केस अचानक वाढतात त्यामुळे चेहरा चांगला दिसत नाही. यासाठी बेसनमध्ये हळद आणि दही मिक्स करून जिथे जास्तीचे केस आहेत तिथे मालिश केल्यास शरीरावरील जास्तीचे येणारे केस कमी होणार.

टक्कल

आजकाल भारतात फार कमी वयात केस गळण्याच्या तक्रारी समोर येत आहे. युवकात हा प्रकार मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. यासठी आपण एक घरगुती इलाज करू शकतो. कलोन्जी आणि मेथीदाण्याचा पेस्ट मध्ये नारळ तेल वापरून ते डोक्यास लावले तर टक्कलपासून बचाव होतो.

पायाचा येणारा घाणेरडा वास

एखाद्या वेळेस शूज अथवा चप्पल घातली तरी पायाचा घाणेरडा वास येतो आणि त्यामुळे आपल्याला सार्वजनिक ठिकाणी नामुष्कीस सामोरे जावे लागते यासाठी बेसनात दही मिसळून पायाला लावल्यास त्वचेवरील छोटे छिद्र मोकळे होतात यामुळे पायाचा येणारा घाणेरडा वास चालला जातो.

केसात होणारा कोंडा

केसात होणारा कोंडा यालाच आपण dandruf देखील म्हणतो हे टक्कल पडण्यास देखील कारणीभूत ठरते. बेकिंग सोडा म्हणजे खाण्याच्या सोड्यात दही मिसळून केसाची मालिश केल्यास केसात होणारा कोंडा कमी होतो.

चेहऱ्यावरील तेज

काही जनाच्या चेहऱ्यावर एक नाराजी दिसते कारण काय तर चेहऱ्यावर ग्लो किंवा तेज नाही यासाठी तुम्ही खालील उपाय वापरू शकता. साबुदाणा मिक्सर मध्ये बारीक करून यामध्ये बेसन आणि दही मिसळवा आणि हे मिश्रण लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येणार हे नक्की आहे.

डोळ्या खाली येणारे काळे वर्तुळ

याला आपण डार्क सर्कल देखील म्हणतो यामुळे चेहरा आकर्षक दिसत नाही. जागरण , हार्मोनल प्रोब्लेम इत्यादी मुळे डोळ्या खाली हे वर्तुळ पडतात. यासठी संत्राच्या सालीच्या दुध मिसळून डोळ्याच्या खाली मालिश करा डार्क सर्कल कमी होतील.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *