आपल्या मृत पतीच्या आठवणीत तिने १३ वर्षात लावली ७३००० झाडे !

मागच्या आठवड्यात झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बंगलोर मिररने जनेत याग्नेश्वरन या महिलेविषयीची बातमी जगासमोर आणली. २००५ मध्ये जनेत यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर आपल्या पतीची आठवण म्हणून जनेत यांनी झाडे लावण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार मागच्या १३ वर्षांत जनेत यांनी बेंगलोर आणि कर्नाटकात मिळून ७३००० झाडे लावली आहेत. या वर्षीच्या शेवटपर्यंत ही संख्या ७५००० पर्यंत नेण्याचा त्यांचा संकल्प आहे.

अशी झाली झाडे लावायला सुरुवात

सप्टेंबर २००५ मध्ये जनेत यांच्या पतीचे निधन झाले. हा तोच काळ होता जेव्हा बेंगलोर शहरातील विकासकामांसाठी मोठ्या संख्यने वृक्षतोड करण्यात आली होती. जनेतच्या काही मित्रांनी तिला धरणं आंदोलनाचा मार्ग सुचवला. पण जनेतला साकारात्मक कृतीतून काम करून समाजासमोर आदर्श ठेवायचा होता. तेव्हा आपल्या पतीची आठवण म्हणून जनेत यांनी झाडे लावण्याचा संकल्प केला.

आपल्या वृक्षारोपणाच्या कामासाठी त्यांनी “रजनेत याग्नेश्वरन चॅरिटेबल ट्रस्ट”ची स्थापना केली. ५ जून २००६ रोजी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या पतीच्या स्मरणार्थ पहिले झाड लावले. त्या पहिल्या झाडाचा आता वृक्ष झाला असल्याचे पाहून जनेत यांना अभिमान वाटतो.

अशी घेतली काळजी

जनेत यांनी लोकांना आवाहन केले की आपण फक्त आपल्याच बगिच्यात झाडे लावुन भागणार नाही. रस्त्यांच्या कडेने लावलेल्या रोपांची निगा राखली जावी यासाठी त्यांनी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. यात त्यांना कधी लोकांची साथ मिळाली, तर कधी लोकांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. पण जनेत आपल्या ध्येयावर ठाम राहिल्या.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जनेत यांनी उचललेलं पहिलं पॉल आज एक अभियान बनले आहे. ट्रस्टच्या माध्यमातून वृक्षारोपणाला सुरुवात झाल्यानंतर काही लोकांनी त्यांच्या कामात मदतीचा हात पुढे केला, तर काही लोक त्यांच्या मार्गात आडवे आले. सुरुवातीच्या काळात त्यांनी खिशातून पैसे घातले, पण नंतर येणाऱ्या देणग्यांवर त्यांचा खर्च मागायला लागला. जनेत याग्नेश्वरन यांच्या सध्याच्या नियोजनानुसार त्या कूर्ग येथे १००० झाडे आणि तामिळनाडूच्या तंजावर येथे १००० झाडे लावणार आहेत.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *