अकबरुद्दीन ओवेसी कशामुळे लंडनच्या दवाखान्यात भरती आहे ?

हैद्राबादमध्ये चंद्रयानगुट्टी नावाचा विधानसभा मतदारसंघ आहे. अकबरुद्दीन ओवेसी या विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. यांची दुसरी ओळख म्हणजे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे अध्यक्ष तसेच हैद्राबादचे खासदार असाउद्दीन ओवेसी यांचे ते धाकटे बंधू आहेत.

यांची तिसरी ओळख म्हणजे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारे एमआयएमचे हेच ते आमदार ! पण हे महाशय सध्या कुठल्याच चर्चांमध्ये नसतात, कारण सध्या ते आजारी असून त्यांच्यावर परदेशात उपचार सुरु आहेत.

अकबरुद्दीन ओवेसी आजारी असल्यामुळे लंडन येथील एका दवाखान्यात उपचारासाठी त्यांना भरती करण्यात आले आहे. हैद्राबादच्या दारुसलममध्ये ईद मिलापच्या कार्यक्रमासाठी आले असताना असाउद्दीन ओवेसींनी याचा खुलासा केला.

आपल्या समर्थकांच्या गर्दीत आल्यावर त्यांनी आवाहन केले की, “मी सर्वाना ईदच्या शुभेच्छा देतो. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की अकबरुद्दीन यांची प्रकृती सुधारावी यासाठी सर्वांनी अल्लाला दुवा करावी. उपचारासाठी ते लंडनला गेले आहेत. अल्ला त्यांना सुरक्षित ठेवो.” आंध्रप्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनीही ११ जूनला ट्विटरवर ट्विट करून अकबरुद्दीन ओवेसी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे.

२०११ मध्ये लागलेली गोळी आताही देते त्रास

३० एप्रिल २०११ रोजी हैद्राबादच्या बरक्स भागात अकबरुद्दीन ओवेसींवर हल्ला झाला होता. त्यात त्यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर इलाज करून दोन गोळ्या शरीराबाहेर काढण्यात आल्या, मात्र एक गोळी अजूनही त्यांच्या शरीरात अडकून आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर २०११ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर कोर्टाने चार आरोपींना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

हैद्राबादमध्ये आजतक चॅनेलच्या पत्रकार सय्यद हुसेन यांनी सांगितले की, “त्या गोळीमुळे अकबरुद्दीन ओवेसींच्या शरीरात लोह तयार होत नाही. त्यामुळे त्यांना दरवर्षी लंडनला उपचारासाठी जावे लागते. यावर्षीही उपचारासाठी ते लंडनला गेले आहेत.” अकबरुद्दीन ओवेसी यांच्या पोटात त्रास आहे. त्यांना उलट्या होत असून पोटात दुखत आहे. मागच्या दिड महिन्यांपासून ते लंडनमध्ये दवाखान्यात भरती आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *