युवराजसारखंच ‘या’ ५ महान खेळाडूंना देखील मैदानाबाहेरच घ्यावी लागली निवृत्ती!

भारतला २०११ चा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडणारा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. युवराजने २०११ च्या विश्वचषकात ९ सामन्यात ९०.५० च्या सरासरीने ३६२ रन आणि १५ विकेट्स घेतल्या होत्या. त्या विश्वचषकात त्याला “प्लेयर ऑफ द सीरीज” मिळाला होता.

२०११ विश्वचषकादरम्यान युवराज कँसरसारख्या गंभीर आजाराशी लढत होता तरी देखील त्याने कोणालाही याची खबर नाही लागू देईल आणि भारताला जिंकून दिला होता. युवराजने क्रिकेटमध्ये भारतासाठी मोठे योगदान दिले. पण त्याला निवृत्ती मैदानाबाहेरच घ्यावी लागल्याने क्रिकेटप्रेमी नाराज झाले आहेत. पण अशी मैदानाबाहेर निवृत्ती घेण्याचं दुर्भाग्य युवराजच्याच नाही तर ५ महान भारतीय खेळाडूंच्या देखील नशिबी आले आहे.

खासरेवर जाणून घेऊया कोण आहेत हे ५ महान खेळाडू-

राहुल द्रविड- ‘द वॉल’ ही बिरुदावली मिरवणाऱ्या राहुल द्रविडलाही पत्रकार परिषद घेऊन निवृत्ती जाहीर करावी लागली होती. द्रविडला क्रिकेटच्या इतिहासातील एक महान फलंदाज म्हणून ओळखले जाते. ऑगस्ट २०११ मध्ये, इंग्लंडविरूद्ध एकदिवसीय मालिकेसाठी अचानक निवड झाल्यानंतर, त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधून निवृत्ती जाहीर केली आणि मार्च २०१२ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेट मधूनही निवृत्ती जाहीर केली.

व्हीव्हीएस लक्ष्मण- व्हीव्हीएस लक्ष्मणलाही मैदानात निवृत्ती घेता आली नाही. लक्ष्मणने १३४ टेस्टमध्ये १७ सेंच्युरीज लगावल्या होत्या. १६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर क्रिकेटला अलविदा केला होता. भारतासाठी अनेक मॅचचा लक्ष्णन तारणहार ठरला. भारतासाठी सातत्याने खेळताना युवा खेळाडूंचा मार्ग रोखून धरल्याच्या टीकेमुळे निराश झालेला लक्ष्मण क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याचे सांगितले जाते.

वीरेंद्र सेहवाग- सेहवागलाही मैदानाबाहेरच निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला. भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने दुबईत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. दुबईत एका कार्यक्रमात आपण निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर २० ऑक्टोबर २०१५ रोजी सेहवागने निवृत्ती घेतली.

झहीर खान- भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खानलाही मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निवृत्तीची घोषणा करावी लागली. झहीरने १६ ऑक्टोबर २०१५ पत्रकार परिषद घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा केली होती. दुखापतींमुळे तीन ते चार वर्षे झहीर खान भारतीय संघाबाहेर होता. त्यामुळे नाईलाजाने झहीरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली होती.

गौतम गंभीर- काही दिवसांपूर्वी गौतम गंभीरने रणजी सामना खेळत आपली निवृत्ती जाहीर केली होती. २००७ मध्ये ट्वेन्टी-२० वर्ल्डकप तर २०११ मध्ये वनडे वर्ल्डकप भारताला जिंकून देण्यात गंभीरचा मोलाचा वाटा होता. २०११ वनडे वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत गंभीरने दडपणाच्या क्षणी साकारलेल्या ९७ धावांच्या खेळीने भारताच्या विश्वविजयाचा पाया रचला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *