टिकटॉक स्टार चोर निघाला, वृद्धाच्या घरातून चोरले पावणेपाच लाख रुपये !

या पृथ्वीतलावर टिकटॉक नावाची एक गोष्ट आढळते. आता या टिकटॉक विषयी तेच ते काहीतरी सांगितले जाईल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फार भोळे आहात. याउलट तुम्हाला खरोखरच या टिकटॉक विषयी काही माहित नसेल, तर इतर लोकांपेक्षा तुम्ही नक्कीच चार-पाच वर्षे जास्त जगाल याविषयी आमच्या मनात काहीही शंका नाही. तर मंडळी या टिकटॉकवर एक स्टार आहे.

भावाला फटाफट फॉलो केलं जाते. आज जिथे लोकं शे-दोनशे लाईक लाईक मिळाले की पार्टी मागतात, तिथे या भावाला टिकटॉकवर ९ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तर झाला ना भाऊ स्टार ! पण हा झाला शक्तिमान ! अजून भावांमधला गंगाधर अजून तुम्हाला कुठे माहित झाला आहे ? पाहूया या टिकटॉक स्टारची दुसरी बाजू…

टिकटॉक स्टारने केली पाच लाखांची चोरी

या टिकटॉक स्टारचे नाव अभिमन्यू गुप्ता आहे. या स्टारने जुहू मधील एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी चोरी केली आहे. थोडीथोडकी नाही, तर तब्बल पावणेपाच लाखांची ! आणि चोरी करण्याची त्याची काय पहिली वेळ नव्हती. स्थानिक वर्तमानपत्रे आणि पोलिसांच्या माहितीनुसार अभिमन्यू गुप्तावर चोरीच्या चार-पाच तक्रारी नोंद आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अभिमन्यूला चोरीची सवय आहे. या टिकटॉक स्टारमधील चोर उघडा पडल्यावर किती लोकांना तो हिरो वाटतो ते एकदा विचारले पाहिजे !

असा सापडला चोर

झालं असं की जुहू पोलिसांमध्ये काही दिवसांपूर्वी एका वृद्ध दाम्पत्याने त्यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती. एक चोर त्यांच्या घरात आला आणि घरातील सामानाची तोडफोड करुन त्यांच्या घरातून महागडे दागिन्यांसोबत मोबाईल फोन चोरून पळून गेला. त्यांनी सांगितले की चोराने पावणेपाच लाख रुपयांचे सामान चोरीला नेले.

त्यानंतर पोलिसांनी बिल्डिंगमधील CCTV फुटेज तपासले. त्यात त्यांना अभिमन्यूचा चेहरा दिसला. त्यावरून पोलिसांनी अभिमन्युला ताब्यात घेतले. पॉलिसी खाक्या दाखवताच अभिमन्यूने चोरीची कबुली दिली आणि चोरलेल्या वस्तू परत केल्या.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *