शिवरायांचा भगवा इंग्लंड मधील ओवेल स्टेडियममध्ये फडकवणारा तो पठ्या कोण वाचा खासरेवर

सध्या विश्वचषकाच्या रणधुमाळी मध्ये अनेक क्रिकेटचे व्हिडीओ वायरल होत आहे परंतु त्यापैकी काल वायरल झालेला व्हिडीओ ची चर्चा महाराष्ट्रात सगळीकडे चर्चा होत आहे. तर विषय असा आहे कि काल झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सामन्यात शिवरायांचा भगवा डौलाने फडकत होता आणि सोबत शिवरायांच्या घोषणा देखील ऐकायला मिळाल्या परंतु हे काम करणारा बहाद्दर आहे तरी कोण ?

मागील वर्षी आयपीएल मध्ये देखील हा प्रेरणादायी प्रसंग घडला होता. महाराजांनी दिलेले संस्कार आजही रयत विसरले नाहीत. उत्तर ध्रुव, समुद्र, आकाश अशी फार क्वचित जागा राहिल्या असेल जिथे महराजांचा भगवा फडकला नाही. आम्ही या व्हिडीओचा शोध घेतला असता तर कोल्हापूर मधील युवकाचा हा व्हिडीओ असल्याचा कळले.

कोल्हापूरच्या योगेश यांचा हा व्हिडीओ

तर या व्हिडीओ मधील व्यक्ती कोल्हापूर येथील उद्योजक योगेश बनछोडे यांचा हा व्हिडीओ असल्याचा माहिती झाले. कोल्हापूर येथील युवा उद्योजक योगेश यांनी हा व्हिडीओ काल भारत vs ऑस्ट्रेलिया लंडन मध्ये ओवेल या स्टेडियम वर वर्ल्ड कप मॅच चालू असताना काढलेला आहे.

या विषयी त्यांनी फेसबुकवर लिहले आहेत कि, “आज दिनांक 9/6/2019 रोजी भारत vs ऑस्ट्रेलिया लंडन मध्ये ओवेल या स्टेडियम वर वर्ल्ड कप मॅच चालू असताना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकवताना एक गर्व आणि माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण…”

कोल्हापूर येथील योगीराज मोबाईल्सचे मालक आहेत. या प्रसंगी त्यांच्या सोबत कोल्हापूर गादीचे युवराज छत्रपती मालोजीराजे देखील होते हे कळले आहे. महाराष्ट्रातील अनेकांसाठी हि गर्वाची बाब आहे.

आपल्याला देखील हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. तुम्ही आम्हाला आपल्याकडील खासरे गोष्टी info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *