या एका पत्राने बदलले होते गिरीश कर्नाडांचे आयुष्य

बॉलिवुडमध्ये अनेक चांगले चित्रपट देणारे प्रसिद्ध साहित्यकार आणि अभिनेता गिरीश कर्नाड यांचे आज १० जून रोजी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. ते कर्नाटकातील असले तरी त्यांचा जन्म महाराष्ट्रातील माथेरान येथे कोकणी कुटुंबात झाला होता. एक चांगले कलाकार असण्याबरोबरच ते एक चांगले लेखक, पुरस्कारप्राप्त कथालेखक आणि दिग्दर्शकही होते. सलमान खानच्या एक था टायगर आणि टायगर अभी जिंदा है या चित्रपटात आपल्याला त्यांचा अभिनय पहायला मिळाला.

गिरीश कर्नाड हे आपल्या लेखन शैलीसाठी चांगलेच प्रसिद्ध होते. अनेक ऐतिहासिक पात्रांची आजच्या वर्तमानाच्या संदर्भाने मांडणी करुन समाजाला जागृत करणारे लेखक म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी लिहलेल्या अनेक नाटकांमधून याची प्रचिती येते. त्यामध्ये तुघलक, ययाती आणि इतर नाटकांचा समावेश आहे. कर्नाड यांनी अशा अनेक कथा आणि नाटके लिहली आहेत. त्यांच्या अनेक चित्रपट कथांवर मेरी जंग, अपने पराये, डोर स्वामी, एक था टायगर आणि टायगर अभी जिंदा है असे चित्रपट निघाले आहेत.

गिरीश कर्नाड यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. १९९४ मधये त्यांना साहित्य अकादमी तर १९९८ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. १९७० मध्ये त्यांच्या संस्कार चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले. १९८९ त्यांच्या कनक पुरंदर चित्रपटाला सुवर्ण कमळ मिळाले. १९७४ मध्ये पद्मश्री आणि १९९२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.

१९७४-७५ मध्ये ते पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे संचालक होते. ‘आडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) या नावाने त्यांचे कन्नड आत्मचरित्र आहे, त्याचे ’घडले कसे’ या नावाने मराठी भाषांतर करण्यात आले आहे.

या पत्रामुळे बदलले गिरीश कर्नाडांचे आयुष्य

आपल्या लिखाणाच्या शैलीच्या बाबतीत त्यांनी एका लेखात सांगितले की, “जेव्हा मी १७ वर्षांचा होतो, तेव्हा मी आयरिश लेखक “सीन ओ कैसी” यांचे एक चित्र काढून त्यांना पाठवले होते. त्याबदल्यात त्यांनी मला एक पत्र पाठवले. पत्रात त्यांनी लिहले होते की, मी जे काही हे सगळं करतोय त्यात वेळ वाया घालवला नाही पाहिजे.

उलट असे काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे लोक एक दिवस मला माझा ऑटोग्राफ मागतील.” हे पत्र वाचल्यानंतर गिरीश कर्नाडांनी त्यानुसारच असे उत्कृष्ट काम करून दाखवले ज्यामुळे आज त्यांना आपण सर्वजण मान देतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *