आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी ड्रोनच्या माध्यमातून १८ मिनिटात दुर्गम भागात पोहोचवले ब्लड सॅम्पल !

आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन अगदी सुसह्य झाले आहे. वैद्यकीय सेवांमध्ये तर अशा तंत्रज्ञानामुळे अनेक उपचार सुलभ झाले आहेत. या तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेची चुणूक नुकतीच पाहायला मिळाली आहे. आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांनी उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यातील एका दुर्गम भागात मानव रहित विमान म्हणजेच ड्रोनच्या माध्यमातून यशस्वीरीत्या ब्लड सॅम्पल पोहोच करून नवीन कारनामा करून दाखवला आहे.

या आगळ्यावेगळ्या प्रयोगात ड्रोनने ३२ किलोमीटरचे अंतर अवघ्या १८ मिनिटात पार करून ब्लड सॅम्पल जिल्हा रुग्णालयात पोहोचवले. या प्रयोगाच्या यशस्वीतेमुळे ग्रामीण भागात आरोग्यविषयक सेवांमध्ये क्रांती येऊ शकते.

बातमीनुसार एका दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून रक्ताचे काही नमुने टिहरी येथील जिल्हा रुग्णालयात पोहोचवायचे होते. सीडी प्लेस कंपनीने पायलट प्रोजेक्टच्या अंतर्गत ६ जून रोजी ड्रोनच्या माध्यमातून रक्तचे नमुने पाठवण्याचा डेमो दाखवला होता. सीडी प्लेस रोबोटिक्स लिमिटेड नावाच्या एका फर्मने हा ड्रोन बनवला आहे. निखिल उपाध्याय हे या फार्मचे मालक आहेत. त्यांनी कानपुर येथील आयआयटी मध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांच्या टीममध्ये लीडर निखिल उपाध्याय, कृष्णसिंह गौड, पियुष नेगी आणि सर्वेश सोनकर सहभागी होते.

जिल्हा रुग्णालयाचे चीफ मेडिकल सुपरीटेंडन्ट डॉ.पांगती यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रयोग टिहरी गढवालमध्ये सुरु असणाऱ्या टेली मेडिसिन प्रोजेक्टचा एक भाग होता. रक्ताचे नमुने खराब होण्यापासून वाचवण्यासाठी ड्रोनमध्ये एक कुलिंग किट लावण्यात आले होते.

कसा आहे ड्रोन ?

हा ड्रोन ५०० ग्रॅम पर्यंत वजन घेऊन जाऊ शकतो. ड्रोन एकदा चार्ज केला की ५० किलोमीटर पर्यंत अंतर पार करू शकतो. या ड्रोनला कुठेही सहजरित्या टेक ऑफ आणि लँड केले जाऊ शकते. हा ड्रोन हाताळण्यासाठी २ लोकांची गरज पडते. हा ड्रोन बनविण्यासाठी १० ते १२ लाख रुपये खर्च येतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *