अख्खे बोर्ड झटले पण हे भाऊ नाही हटले , सगळ्या विषयात ३५ मार्क ! कोण आहेत हे भाऊ..

दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुद्धा निवडणुकीसारखीच असते. दहावीतला प्रत्येक विद्यार्थी अर्ज भरून बोर्डाच्या परीक्षेच्या उत्सवात सहभागी होतो. परीक्षेपूर्वी सगळ्यांना अभ्यासासाठी वेळ दिला जातो. परीक्षेच्या दिवशी प्रत्येकाला पेपरमध्ये १०० पैकी ३५ चा जादुई आकडा पार करून जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतात.

आता या परीक्षेत जितके १०० पैकी १०० मार्क मिळवणे अवघड नाही, त्यापेक्षा जास्त अवघड म्हणजे प्रत्येक विषयात ३५ मार्क मिळवणे आहे. मात्र यावर्षी दोन पठ्ठ्यांनी दहावीच्या परीक्षेत सगळ्याच विषयात १०० पैकी ३५ मार्क मिळवून ही किमया साध्य केली आहे. पाहूया भावांची किमया…

पुणे तिथे हे पण नाही उणे

बरोबर ! पहिला पठ्ठ्या पुण्याचा आहे. श्रावण राजेश साळुंखे त्याचं नाव ! पुण्याच्या धनकवडीच्या बालाजीनगर भागात असणाऱ्या रोहन माध्यमिक विद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. भाषा म्हणू नका, विज्ञान म्हणू नका, गणित म्हणू नका: भावाने सगळ्याच विषयात १०० पैकी ३५ मार्क मिळवले आहेत.

विशेष म्हणजे श्रावण दहावीत उत्तीर्ण झाला यापेक्षा त्याने सर्वकच विषयात ३५ मार्क मिळवले याचीच जास्त चर्चा आहे. निवडणुकीत जसं एखाद्या किंगमेकर पक्षाचे कमी उमेदवार निवडून आल्यानंतर जास्त चर्चा होते, तशी चर्चा श्रावणची होत आहे.

ठाणे तिथेही नाही काही उणे

पुणे आणि ठाणे यांची आतापर्यंत यमक जुळणारी शहरे म्हणून सोबत नावे घेतली जायची. पण आता दहावीच्या परीक्षेत १०० पैकी ३५ मार्क मिळवण्याच्या बाबतीतही पुणे आणि ठाणे ही नावे एकत्र घ्यायला लागतील. पुण्यानंतर ठाण्यातील मीरारोड भागात राहणाऱ्या अक्षित गणेश जाधव या भावड्यानेही सर्व विषयात १०० पैकी ३५ मार्क मिळवण्याची किमया साध्य केली आहे.

विशेष म्हणजे अक्षितला नववीत एकदा अपयश आले होते. मात्र दहावीत १७ नंबरचा फॉर्म भरुन त्याने परीक्षा दिली आणि त्यात यश तर मिळवलेच सोबत सगळीकडे चर्चेतही आला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *