२१ वर्षाची मुलगी अवघ्या १८ महिन्यातच फिरली जगातील १९६ देश!

१९६७ मध्ये राज कपुर यांचा “Around the World in Eight Dollars” नावाचा सिनेमा आला होता. या सिनेमातील राज कपुर खिशात केवळ आठ डॉलर असतानाही जगाची सफर करुन येतो आणि त्या सफरीवर गाणे गातो. इतक्या कमी पैशात जगाची सफर ही केवळ एक कल्पनाच असू शकते. मात्र हीच कल्पना एका २१ वर्षांच्या मुलीने सत्यात उतरवली आहे. ती मुलगी जगातील जवळपास १९६ देश फिरली आहे. पाहूया मुलीला हे कसे शक्य झाले…

कोण आहे ती मुलगी आणि कशी फिरली इतके देश ?

अमेरिकेची लेक्सी एल्फोर्ड ही जगातील जवळपास सर्वच म्हणजे १९६ देश फिरली असून ती केवळ २१ वर्षांची आहे. ३० मे २०१९ रोजी लेक्सी उत्तर कोरियाला पोहोचली, जो तिच्या विश्वभ्रमंती मधील शेवटचा देश होता. उत्तर कोरियात पोहचताच लेक्सीने २४ वर्षांपूर्वीचा जुना गिनीज विश्व विक्रमही मोडीत काढला. आता ती सर्वात कमी वयात संपूर्ण जग फिरणारी महिला बनली आहे. तिचे कुटुंब कॅलिफोर्नियामध्ये एक ट्रॅव्हल एजन्सी चालवतात.

कसा केला लेक्सीने १९६ देशांचा प्रवास

लेक्सी लहान असताना तिचे आईवडील वारंवार तिची शाळा बदलायचे. दरवर्षी तिला वेगवेगळ्या ठिकाणी शिकण्यासाठी पाठवायचे. जसजशी ती मोठी होत जेकी तसतशी तीची विविध देश फिरण्याची आवड वाढत गेली. तिच्या पालकांनी तिला कंबोडियाच्या तरंगत्या गावांपासून दुबईचा बुर्ज खलिफा आणि इजिप्तच्या पिरॅमिडपर्यंत फिरवले.

ते तिला तिथल्या ठिकाणांचा इतिहास आणि महत्वही सांगतात. या गोष्टीचा लेक्सीवर इतका प्रभाव पडला की, तिला जग बघण्याची इच्छा झाली. त्यानंतर २०१६ पासूनच तिने विविध देश फिरायला सुरुवात केली. ती १८ वर्षांची असतानाच तिचे ७८ देश फिरून झाले होते.

२४ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम

लेक्सीच्या अगोदर हा विक्रम कैसी द पेकॉल या महिलेच्या नावावर होता. ती लेखिका आणि एक ट्रॅव्हलर आहे. वयाच्या २७ व्या वर्षीच तिने अवघ्या १८ महिन्यातच १९६ देश फिरून सर्वात वेगाने देश फिरण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला होता. यादरम्यान तीने ४० देशातल्या १६००० विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना भेट दिली. फिरता फिरता तिच्याकडचे पैसे संपले, शेवटी लोकांनी तिला पैसे गोळा करून दिले आणि तिने नॉनस्टॉप १९६ देश फिरले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *