मोदींचा म्हणून व्हायरल झालेला हा फोटो कलामांचा कि मोदींचा? काय आहे सत्य..

मोदी यांची दुसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर नवनवीन गोष्टी व्हायरल होत आहेत. त्यांच्याबद्दल काही नवीन माहिती शोधण्याचा प्रयत्न त्यांचे चाहते करत आहेत. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक महिला आणि एक छोटा मुलगा आहे. जुना असलेला हा फोटो मोदी यांचा असल्याचा दावा केला जात आहे.

नरेंद्र मोदी आणि त्यांची आई हिराबेन यांचा हा फोटो असल्याचा पोस्ट सोशल मीडियावर अनेकांनी केलेल्या बघायला मिळतील. या फोटोसोबत पोस्टमध्ये लिहिले जात आहे कि, ‘हाच तो मुलगा ज्याने १३२ कोटी जनतेला हादरवून ठेवले आहे. नरेंद्र मोदी आपली आई हिराबेन सोबत’.

हा फोटो फक्त मोदी यांच्या नावानेच नाही तर या अगोदर डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा म्हणून देखील वायरल झाला आहे. पण या फोटोची सत्यता वेगळीच असून हा फोटो नरेंद्र मोदी यांचा देखील नाहीये आणि डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा देखील नाहीये. जाणून घेऊया या फोटोमागची सत्यता.

काय आहे सत्यता-

गुगलवर इमेज सर्च करून या फोटोची सत्यता तपासली असता हा फोटो डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा असल्याची माहिती मिळाली. या फोटोमध्ये डॉ कलाम आणि त्यांची आई अशिअम्मा जैनुलाब्दीन या आहेत असा दावा करण्यात आलेला आहे. इंडिया टुडेने मदर्स डे ला एक स्पेशल स्टोरी केली होती. त्यामध्ये हा फोटो वापरण्यात आला होता.

हा वायरल झालेला फोटो अर्धवट असून पूर्ण फोटोमध्ये एक महिला आणि मुलाशिवाय २ अजून मुलं आणि एक पुरुष देखील आहे. पण या फोटोची सत्यता डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल ट्रस्टचे ट्रस्टी एपीजेएमजे शेख सलीम यांनी वेगळीच असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले कि हा फोटो डॉ कलाम यांचा नाहीये. पण हा फोटो अब्दुल कलाम यांचा म्हणून इंटरनेटवर उपलब्ध आहे.

यावरून हा व्हायरल फोटो मोदींचा आणि एपीजे अब्दुल कलाम यांचा नसल्याचे स्पष्ट होते. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *