धर्मेंद्रच्या हँडसम नातवासमोर सगळे स्टारपुत्र आहेत फेल

बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल बोलायचं म्हणलं तर इथे हँडसम अभिनेत्यांची कसलीच कमी नाही. इकडे एकापेक्षा सरस अभिनेत्यांची रांग लागली आहे. धर्मेंद्र पाजीही यात मागे नाहीत. आपल्या चित्रपट करिअरमध्ये त्यांनी एकापेक्षा एक भारी सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

एकेकाळी दिलीप कुमार यांच्यासारखा अभिनेताही धर्मेंद्रच्या लूकवर प्रभावित होते. धर्मेंद्रच्या हाच लूक वारसाने त्यांचा नातू आर्यमान देओलला मिळाला आहे. आर्यमान बॉबी देओलचा मोठा मुलगा आहे. पाहूया आर्यमानबद्दल खास गोष्टी…

आर्यमानचे फोटो व्हायरल

आर्यमान देओलला आतापर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर ठेवले होते. बँकॉक मध्ये झालेल्या आयफा समारंभात आर्यमानची पहिली झलक बघायला मिळाली होती. या कार्यक्रमात आर्यमान काळ्या सूटमध्ये खूपच हँडसम दिसत होता. त्याचे हे फोटो सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले. आर्यमान देओलचे व्हायरल झालेले फोटो मुंबई विमानतळावरील आहेत. यात आर्यमान आपल्या पत्रींवरसोबात दिसत आहे.

त्यात वडील बॉबी देओल, आई तान्या आणि त्याचा लहान भाऊ दिसत आहे. आर्यमानने ऑरेंज कलरचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. डोळ्यनवर काळ्या रंगाचा चष्मा घातला आहे. त्याच्याकडे पाहून असे म्हणता येईल की त्याचा लूक हा अगदी सेलेब्रिटीसारखाच आहे. अनेक लोक त्याच्या लिकची परदेशी अभिनेत्यांसोबत तुलना करतात. आयर्मानच्या हँडसम लूक समोर इतर अभिनेत्यांची स्टारकिड्स फेल आहेत.

बॉबी देओलचं चाललंय काय ?

रेस ३ मधील पुनरागमनानंतर बॉबी देओलचा आत्मविश्वास चांगलाच वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळते. रेस ३ नंतर बॉबी यमला पगला दिवाना मध्ये आपले वडील धर्मेंद्र आणि भाऊ सनीसोबत दिसला. त्यांनतर “हाऊसफुल ४” मध्येही आपल्याला बॉबी बघायला मिळेल. देओल कुटुंबातील सनीचा मुलगा करण हासुद्धा “पल पल दिल के पास” मधून एंट्री करणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *