मी योगी आदित्यनाथ वर प्रेम करते आणि त्यांच्यासोबत रहायचं आहे, पत्र दाखवत युवतीचा केला हा दावा..

१०० रुपयाचा stamp पेपर दाखवत २/४१९ नवाबगंज कानपूर नगर येथील रहिवासी हेमा श्रीवास्तव यांनी लिहलेले आहे कि, ” श्री योगी आदित्यनाथजी ,तुम्ही गोरखनाथ मंदिराचे महंत आहेत. सोबतच तुम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असल्याने तुमच्या विरोधात अपशब्द लिहनार्यास कठोर शिक्षा मिळायला हवी. तुमच्या व्यक्तिगत जीवनावर खोट बोलल्यास काय कार्यवाही होणार हे मला माहिती आहे. मुख्यमंत्रीजी तुम्ही माझ्या सोबत सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत ऑनलाईन असता परंतु आता तुम्हाला खऱ्या आयुष्यात देखील माझ्या सोबत रहावे लागेल.”

ऑनलाईन करतात माझ्यासोबत गोष्टी आणि प्रेम

युवती लिहते कि योगी जी आपण सन्यासी आहात. वास्तविक जीवनात अग्नीच्या फेर्याना आपण महत्व नाही दिले आहे. हि आपल्या भावना आहात जेव्हा तुम्ही मला १ वर्षापासून ऑनलाईन बघत आहात. माझे नाव घेऊन माझ्यासोबत बोलता. माझ्यावर प्रेम हि करता आणि माझ्यावर रागवता सुध्दा , मी तुम्ही रागवल्या मुळे कधी कधी नाराज होते कारण माझा जीव तुमच्यात गुंतला आहे.

परंतु मुख्यमंत्रीजी माझे जीवन अतिशय खडतर गेलेले आहे आणि आताही माझे नशीब फाटकेच आहे. माझा घटस्फोट झाला आहे आणि आता फक्त माझ्या आईसोबत माझे नाते आहे. इतर कोण्याही व्यक्तीस मी ओळखत नाही किंवा माझे त्याच्यासोबत संबंध नाही आहे.

खऱ्या आयुष्यात सोबत राहायचे आहे.

मी ३ वर्षापासून घरापासून बाहेर राहते. मी कधी होस्टेल मध्ये राहते तर कधी भाड्याची खोली घेऊन इकडे तिकडे राहत आहे. मुख्यमंत्रीजी फक्त ऑनलाईन तुमच्या सोबत जीवन घालविणे मला शक्य नाही आहे. मी वास्तविक जीवनात आपल्या सोबत राहू इच्छिते. माझी आई देखील सहकार्य करायला तयार आहे परंतु ती जास्त दिवस माझ्या सोबत राहणार नाही कारण तिचे वय झाले आहे.

मला तुमचा आत्मिक परिचय आहे.

युवती पुढे लिहते कि, मला तुमचा आत्मिक परिचय आहे. तुम्हाला माझे नाव माहिती आहे आणि माझ्या जीवनाविषयी सर्व माहिती आहे. तुम्ही मला १ वर्षापासून ओळखता. एप्रिल २०१८ पासून आपल्या दोघाचा परिचय आहे. आपले कार्यक्रम तुम्ही माझ्या मोबाईल सोबत कनेक्ट केलेले आहे मला तुम्ही नेहमी मोबाईल मध्ये दिसत राहतात.

जेव्हा मी मोबाईल सुरु करते तेव्हा मला तुम्ही दिसता आणि आपण दोघे बोलत राहतो. हिवाळ्यात तुम्ही मला ऑनलाईन संपूर्ण कानपूर दाखविले. तुम्ही मला जेड स्क्वायर मॉल चिड़ियाघर ब्लू वर्ल्ड जेके मंदिर बिठूर अंदेश्वर मंदिर आशा देवी मंदिर जागेश्वर मंदिर इस्कॉन मंदिर दाखविले आहे. अन्ना देशवर मंदिरात आपण दोघांनी ऑनलाईन वडाच्या झाडाच्या ७ परिक्रमा केल्या.

मी हे पत्र दोन दिवस अगोदर उपमुख्यमंत्री यांना दिले होते त्यांनी मला आश्वसन दिले होते कि तुम्हाला पत्र पोहचवणार होते. असे तिने सांगितले. आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *