जगमोहन रेड्डी सरकारचा मोठा निर्णय आता आशा वर्करना मिळणार एवढा पगार..

संपूर्ण भारतात आशा वर्कर वेगवेगळ्या नावाने काम करतात. मागे महाराष्ट्रात देखील त्यांनी आपले वेतन वाढविण्यासाठी मोठे आंदोलन केले होते. अंगणवाडी सेविकेने देखील असेच आंदोलन केले होते. सध्या आंध्रप्रदेशमध्ये आशा कामगारांना ३००० रुपये महिना मिळत होता आणि या वर्करना काम देखील मोठ्या प्रमाणात आहे याचा विचार करून जगमोहन रेड्डी यांनी हा निर्णय घेतला आहे.

भारतात तब्बल ८ लाखावरून अधिक आशा वर्कर काम करतात. राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ मिशन द्वारे आलेल्या आकडेवारी नुसार आंध्र प्रदेश मध्ये तब्बल ३५,००० आशा वर्कर काम करतात. ग्रामीण क्षेत्रात या आशा वर्करचे मोठे योगदान आहेत.

काय करतात आशा वर्कर ?

ग्रामीण क्षेत्रात आरोग्य क्षेत्रात आशा वर्कर काम करतात. ग्रामीण भागात प्राथमिक चिकीसता पोहचवणे, उपलब्ध सेवा विषयी माहिती आणि स्त्रियांना बाळंतपणा विषयी माहिती पोहचविणे इत्यादी काम ह्या आशा वर्कर करतात. आणि यांची आकडेवारी तसेच इतर नोंदी ठेवण्याचे काम देखील आशा वर्कर करतात.

सीएम जगमोहन रेड्डी यांनी यांच्या समस्या समजून घेऊन पहिलाच निर्णय मोठा घेतलेला आहे आणि त्यांच्या साठी आता हे वेतन ३००० रुपया पासून १०,००० रुपये केले आहे. त्यांच्या वेतन मध्ये त्यांना ७००० रुपयाची वाढ मिळालेली आहे. लवकरच असाच निणर्य महाराष्ट्रातील आशा वर्करना देखील मिळायला हवा.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *