कधी तुटणार क्रिकेट विश्वचषकातील हे रेकोर्ड, नंबर १ तर सर्वात भयंकर रेकॉर्ड

क्रिकेट मध्ये वेगवेगळे रेकोर्ड होतात आणि तुटतात परंतु विश्वचषकाची किमया न्यारी दर चार वर्षाने होणारे विश्वचषक आणी त्यामध्ये बनणारे रेकोर्ड याची चर्चा नेहमी होत राहते. ३० मे पासून सुरु झालेल्या या रणसंग्रामात कोण बाजी मारणार हे मजेशीर आणि रोमांचकारक राहणार आहे. तर आता बघूया काही जुने न तुटणारे रेकॉर्ड

५. जगातील क्रिकेटचा सर्वात मोठा स्कोर

वर्ल्डकप मध्ये सर्वात जास्त धावा बनविण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलिया कडे आहे त्यांनी २०१५ मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध ४१७ धावा काढल्या होत्या. त्या पाठोपाठ दोन नंबर ला २००७ मध्ये भारताने बर्मुडा सोबत ४१३ धावा काढल्या होत्या आणि तीन नंबर ला साउथ आफ्रिका ज्यांनी आयरलंड विरुद्ध २०१५ मध्ये ४११ धावांची खेळी केली होती.

४. सर्वात चांगला यष्टिरक्षक

विश्वचषकात यष्टीच्या मागे सर्वात जास्त विकेट घेण्याचा रेकॉर्ड कुमार संगकारा याच्या नावे आहे त्याने आत्तापर्यंत ३७ मैचमध्ये ५४ विकेट घेतलेल्या आहेत. त्यापाठोपाठ दोन नंबर ला ऑस्ट्रेलियाचा एडम गील्क्रिस्ट आहे त्यांनी ३१ मैच मध्ये ५१ विकेट घेतलेल्या आहे आणि तीन नंबर ला भारताचा एम एस धोनी ज्यांनी २० मैच मध्ये ३२ विकेट घेतल्या आहेत.

३. वर्ल्ड कप मध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा खेळाडू

वर्ल्ड कप सर्वात मोठी खेळी खेळणारा खेळाडू मार्टिन गुप्तील यांनी २०१५मध्ये १६३ चेंडूत २३७ रन काढले. यामध्ये २४ चौकार आणि ११ चौकार होते. यानंतर येतो क्रिस गेल याने २०१५ मध्ये १४७ चेंडूत २१५ धावा काढल्या होत्या यामध्ये १० चौकार आणि १६ षटकार आहेत. आणि तीन नंबरला गैरी कर्स्टन यांनी १९९६ मध्ये १५९ चेंडूत १८८ रन काढले यामध्ये १३ चौकार आणि ४ षटकार आहेत.

२. वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक रन

वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक धावा सचिन तेंडूलकर यांच्या नावावर आहे सचिनने ४५ सामन्यात तब्बल २२७८ रन काढलेले आहे यामध्ये २४१ चौकार आणि २७ षटकार आहेत. यानंतर येतो रिकी पोंटिंग त्याच्या नावावर ४६ सामन्यात १७४३ धावा बनविल्या आहेत. यामध्ये १४५ चौकार आणि ३१ षटकार आहेत. आणि तीन नंबरला कुमार संगकारा त्याच्या नावे ३७ सामन्यात १५३२ रन आहेत.

१. सर्वाधिक षटकारचा रेकॉर्ड

विश्व चषकात सर्वाधिक षटकार ए.बी. डेवीलियर्सच्या नावे आहे त्यांनी २३ सामन्यात तब्बल ३७ षटकार मारले आहे. त्यासोबतच क्रिस गेल आहे त्याने सुध्दा २६ सामन्यात ३७ षटकार मारले आहेत. आणि तीन नंबर ला रिकी पोंटिंग आहे ४६ सामन्यात रिकीने ३१ षटकार मारले आहेत.

आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा व आमचे पेज आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *