या गावातील घरांना करत नाहीत रंगरंगोटी तर लग्नातही नसते डेकोरेशन!

आपल्या आयुष्यात रंग हे प्रत्येकाच्या आवडीचे असतात. आयुष्य हे अनेक रंगानी रंगलेलं असतं. रंग प्रत्येकालाच आकर्षित करत असतात. पण उज्जैनच्या आलोट तालुक्यातील कछालिया गावातील ग्रामस्थ घर बांधण्यासाठी लाखो रूपये खर्च करतात पण घराची रंगरंगोटी करत नाहीत. या गावातील फक्त सरकारी कार्यालये आणि मंदिरांवर रंगरंगोटी केलेली असते. इतकेच नाही तर या गावात लग्नकार्य किंवा इतर कार्यक्रमांत डेकोरेशनही करत नाहीत.

खासरेवर जाणून घेऊया या आगळ्यावेगळ्या गावाबद्दल-

उज्जैनच्या आलोट तालुक्यातील कछालिया या गावात अनेक पिढ्यांपासून ही परंपरा सुरू आहे. गावातील वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वजण या परंपरेचे पालन करतात. अवघी १४०० लोकसंख्या असलेल्या या गावात २०० घरे आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे यातील एकाही घरावर रंगकाम केलेले नाही.

गावात काळ्या रंगाचे कपडे आणि बुटाचा वापर करत नाही लोक

गावात घरांना रंग तर दिले जातच नाहीत पण या गावात काळ्या रंगाच्या वापरावर देखील पूर्णतः बंदी आहे. गावातील कोणतीही व्यक्ती काळ्या रंगाचे कपडे किंवा बूट घालत नाही. अगदी पायमोजे सु्द्धा काळ्या रंगाचे वापरत नाहीत. लग्न कार्यात माता पूजनावेळी सुद्धा रंगाचा उपयोग करत नाहीत. फक्त देवी-देवतांच्या कलाकृतीवर रंग लावून पूजन करण्यात येते. अशाप्रकारे दिवाळीला पशुंच्या शिंग रंगवण्यासाठी तपकिरी रंग लावण्यात येतो.

या परंपरा खूप दिवसांपासून सुरु असल्या तरी यामागचे कारण कुणालाही माहिती नाहीये. गावात हि परंपरा चालत आली आहे आणि ती आताची पिढी देखील पाळते. पण त्यांनाही यामागचे कारण माहिती नाहीये.

घोड्यावर बसून मंदिरासमोरून न जाण्याची देखील आहे परंपरा-

७५ वर्षीय मंदिराचे पुजारी रतनपुरी गोस्वामी यांनी सांगितले की, गावात कालेश्वर भगवानचे मंदिर आहे. भगवान कालेश्वरावर ग्रामस्थांची आस्था आहे. यामुळे मंदिराशिवाय कोणाही आपल्या घरावर रंगरंगोटी करत नाही. ही परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. पण यामागचे अख्यायिका काय आहे याबाबत कोणालाही काहीच माहिती नाही. दोन-तीन वेळेस या परंपरांना तोडण्यात आले असता दुर्घटना घडल्या. कालेश्वर भगवानच्या मंदिरसमोरून कोणीही घोडीवर बसून जात नाही. मंदिराच्या मागील बाजुने निघु जातात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *