पुण्यापासून अतिशय जवळ असलेले ५ वॉटर पार्क, करू शकता एका दिवसाची सहल..

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि वरून सुट्ट्या त्यामुळे बाहेर फिरायला जायचे असेल तर पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले ५ वॉटर पार्क आहेत जिथे आपण जाऊन एका दिवसाची सहल प्लान करू शकता. आपल्या जवळच्या लोकासोबत वेळ घालवायला हे वॉटर पार्क बेस्ट आहे. आपल्यासाठी हि खास माहिती ज्यामुळे तुमचा दिवस चांगला जाऊ शकेल.

Adlabs Aqua Imagica Park

मुंबई आणि पुण्यापासून ७० किलोमीटर अंतरावर Adlabs Aqua Imagica Park आहे. देशातील पहिले अंतराष्ट्रीय दर्जाचा हा वॉटर पार्क आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे वरून सहज आपण येथे पोहचू शकता आणि आपला दिवस आनंदात घालवू शकता. इथे मनोरंजना करिता अनेक राईड आहेत. खालापूर टोल नाक्यापासून इमॅजिका वॉटर पार्क चार किलोमीटर अंतरावर आहे. प्रोढाकरिता १५०० रुपये , लहान मुलाकरिता १२९९ रुपये आणि सिनियर सिटीजन करिता ८९९ एवढी इथे तिकीट आहे. शनिवार रविवार या तिकिटचा दर थोडा जास्त असतो.

डायमंड वॉटर पार्क

पुण्याच्या लोहगाव परिसरात डायमंड वॉटर पार्क आहे. इथे रेन डान्स, फॅमिली पूल, लेझी रिव्हर आणि हनी बनी अश्या राईड सह तब्बल २८ वेगवेगळ्या राईड आहेत. सेफ्टी करिता इथे जीवनरक्षक देखील असतात. रुपये ४९९ पासून येथील तिकीट सुरु होते मोठ्या व्यक्ती करिता इथे तिकीट ७९९ रुपये एवढी आहे. वॉटर पार्क आणि Adventure Park ची तिकीट सोबत घ्याची असेल तर ती १२०० रुपया पर्यंत मिळू शकते.

सेंटोसा रिसॉर्ट वॉटर पार्क

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर रावेतपासून एक किलोमीटर अंतरावर हे वॉटर पार्क आहे. विविध राईड असलेल्या या पार्कमध्ये राहण्याची देखील व्यवस्था केलेली आहे. एका दिवसाची सुट्टी करिता हा देखील एक उत्तम पर्याय आहे. रुपये ४०० पासून पुढे येथील तिकीट आहे जर आपण मुक्कामी जाणार असल्यास आपल्याला हि जास्त पैसे द्यावे लागतील.

कृष्णाई वॉटर पार्क

पुण्यातील सिंहगड किल्ल्याजवळच्या दोनजी गावाजवळ कृष्णाई वॉटर पार्क आहे. पंधरा एकरमध्ये हा भव्य दिव्य वॉटर पार्क उभा करण्यात आलेला आहे. मुलाकरिता ४०० व प्रोढाकरिता ५०० रुपये जवळपास एवढी येथील तिकीट आहे. इथे देखील वेगवेगळ्या राईड आपणास अनुभवायला मिळतील.

पानशेत वॉटर पार्क

पानशेत वॉटर पार्क खडकवासला धरणाच्याजवळ आहे. या पार्कमध्ये आपणास राईड जास्त मिळणार नाही परंतु तुम्हाला येथे वॉटर स्पोटर्सचा पर्याय आहे. जसे स्पीड बोटिंग, वॉटर स्कूटर्स इत्यादी पर्याय तुम्हाला इथे उपलब्ध आहे. इथे २०० रुपये एवढी एन्ट्री फी आहे आणि मध्ये वेगवेगळ्या स्पोर्ट करिता वेगवेगळे प्राईज मध्ये त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा व मजा करायला नक्की या पार्कना भेट द्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *