आधुनिक श्रावणबाळ आईसाठी स्कूटरवर फिरतोय संपूर्ण भारत वाचा का घेतला निर्णय..

आई वडिलाना चारी धाम फिरविणारा श्रावण बाळाची गोष्ट सगळ्यांनी वाचली असेल परंतु या काळात असा कोणी असेल जो आई साठी संपूर्ण भारत स्कूटरवर फिरतोय हे वाचल्यास तुम्हाला धक्काच बसेल परंतु असे झाले आहे. आणि या मागचे कारण हि मनाला लागणारे आहे. अशीच काही गोष्ट कर्नाटक मधील म्हैसूर येथील डी कृष्णाची जे आपल्या ६७ वर्षीय आईला स्कूटरवर भारत भ्रमण करत आहे.

आत्ता पर्यंत डी कृष्णाने तब्बल ३८,४७५ किमी ची यात्रा पूर्ण केली आहे. तर डी कृष्णा सांगतात कि काही वर्षा अगोदर आईला त्यांनी एका मंदिरात चालायची विनंती केली आणि आई बोलली कि मी कुठे मोठ्या मंदिरात जाणार आहे आजपर्यंत मी वेल्लूर देखील पूर्ण बघितले नाही. तुझ्या वडिलांनी मला कुठेच नेले नाही. यावर कृष्णा नि सांगितले कि तू अजून वेल्लूर नाही बघितले मी तुला आता संपूर्ण भारत दाखविणार.

बंगलोर येथील कोर्पोरेट टीम लीडरची नौकरी सोडून आईला संपूर्ण भारत फिरविण्याचा निर्णय घेतला. आणि स्कूटर देखील घेण्याचा निर्णय मुद्दाम घेतला कारण हि जुनी स्कूटर त्याच्या वडिलाची आहे आणि आईला वडिलांची कमी जाणवावी नाही म्हणून स्कूटर ने आम्ही फिरत आहो. १० लोकांचा परिवार वडील चालवत होते त्यामुळे त्यांना देखील हे सर्व करणे मुश्कील होते.

हे सर्व प्रसंग कृष्णा नि बघितले आहे त्यामुळे तो देखील वडिलांना दोष देत नाही. कृष्णाची आई कुंडारत्ना सांगतात कि त्यांना स्कूटरवर भारत भ्रमण करायला फार आवडत आहे. सध्या ते पूर्णिया मार्गे सिलीगुडी जाणार आहेत.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्याकडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.comवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *