आणि अक्षय कुमारने त्याला मिळालेला अवॉर्ड अमीर खानला दिला..

अक्षय कुमार हा बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जातो तर अमीर खान हा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. या दोघांचा एक किस्सा चांगलाच गाजलेला आहे. २००८ मध्ये अक्षय कुमारचा सिंग इज किंग हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अनिल बज़्मी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अक्षय कुमार आणि कतरीना कैफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या सिनेमात केलेल्या अभिनयासाठी अनेकांनी अक्षय कुमारचे कौतुक केले होते. या सिनेमातील चांगल्या अभिनयासाठी अक्षय कुमारला स्टार स्क्रीन अवॉर्ड्सचा बेस्ट ऍक्टर (पॉपुलर चॉइस) अवॉर्ड मिळाला होता. हा अवॉर्ड घेण्यासाठी जेव्हा अक्षय कुमार स्टेजवर गेला त्यावेळी त्याने अवॉर्ड घेण्यासाठी नकार दिला.

अवॉर्ड घेण्यास नकार दिल्यानंतर अक्षय कुमारने सांगितले कि तो १८ वर्षांपासून या पुरस्काराची वाट बघत होता. पण त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता कि चांदणी चौकातुन आलेल्या एका तरुणाला हा अवॉर्ड मिळेल.

त्यावेळी अवॉर्ड हातात घेतल्यानंतर अक्षय कुमार म्हणाला, ‘मी माझ्या एका हातात माझं स्वप्न पकडलं आहे तर दुसऱ्या हातात वडिलांचं प्रेम आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो कि मी काही दिवसांपूर्वी एक सिनेमा पाहिला, गजनी. हा सिनेमा बघून मी थक्क झालो. काही दिवसांपूर्वी लंडनवरून येताना मी सिंग इज किंग देखील बघितला. आणि मी दोन्ही सिनेमातील अभिनेत्यांच्या कामाची तुलना केली. त्यावेळी माझ्या लक्षात आले कि यावर्षीचा बेस्ट ऍक्टर मी नाही तर अमीर खान आहे. मी हा अवॉर्ड घेऊन नाही जाऊ शकत. माझ्यासाठी वोट केलेल्या सर्वांची मी माफी मागतो. देवाची आणि जनतेची इच्छा झाली तर मी हा अवॉर्ड पुन्हा जिंकेल पण आताच खरा दावेदार हा अमीर खान आहे.’

आपण सर्व जाणतो कि अमीर खान हा अवॉर्डच्या कार्यक्रमात जात नाही. ज्यावेळी हे झाले त्यावेळी देखील तो तिथे उपस्थित नव्हता. सिनेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गजनी हा सिनेमा त्यावेळी सुपरहिट ठरला होता. त्याने या सिनेमात केलेला अभिनय सर्वाना खूप आवडला होता. गजनी हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला सिनेमा होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *