शनीदेवाला तेल का चढवले जाते ?

शनीला देवही मानले जाते आणि ग्रहही ! शनीला ज्योतीषामध्ये सूर्याचा पुत्र आणि ग्रहांचा न्यायाधीश मानले जाते. आपल्याकडे शनी जयंती आणि प्रत्येक शनिवारच्या दिवशी शनिदेवाला तेल वाहण्याची परंपरा जुन्या काळापासून सुरु आहे. शनीला कुंडलीमध्ये महत्वाचे स्थान आहे. व्यक्तीच्या चांगल्या वाईट कर्मानुसार शनी त्याचे फळ देत असतो. शनीच्या साडेसातीची सर्वांनाच भीती असते, त्यामुळे आजसुद्धा कित्येक लोक या तेल वाहण्याच्या परंपरेचे पालन करतात. शनीला तेल वाहण्यामागचे कारण जाणून घेऊया…

शनीला तेल वाहण्यासंबंधी वैज्ञानिक कारण

उज्जेनचे ज्योतिष पं.मनीष शर्मा यांनी सांगितले की, आपल्या शरीराच्या सर्व अवयवांत वेगवेगळ्या ग्रहांचा वास असतो, म्हणजेच प्रत्येक अवयवाचा कारक ग्रह असतो. शनी हा आपल्या त्वचा, दात, कान, हाडे आणि गुडघे या अवयवांचा कारक ग्रह आहे. कुंडलीत जर शनी अशुभ स्थितीत असेल तर या अवयवांशी संबंधित त्रास व्यक्तीला सहन करावा लागतो.

या अवयवांच्या विशेष देखभालीसाठी प्रत्येक शनिवारी तेलाने मालिश केली पाहिजे. शनीला तेल अर्पण करण्याचा अर्थ हा आहे की आपण शनीशी संबंधित आपल्या अवयवांना सुद्धा तेल लावले पाहिजे. जेणेकरून त्या अवयवांचे स्वास्थ्य चांगले राहील. मालिश करण्यासाठी मोहरीचे तेल चांगले असते.

शनीला तेल वाहण्यामागचे धार्मिक कारण
प्रचलित असणाऱ्या कथेनुसार पूर्वीच्या काळात शनीला आपल्या ताक्तीवर खूप घमेंड होती. त्याकाळात मारुतीरायाच्या साहस आणि ताकतीची कीर्ती सर्वदूर पसरत होती. शनीला जेव्हा हे समजले तेव्हा तो मारुतीरायसीसोबत युद्ध करायला निघाले. त्यावेळी मारुतीराया श्रीरामाची ध्यानधारणा करण्यात तल्लीन होते. तेव्हाच शनिदेवाने मारुतीरायाला युद्धासाठी ललकारले.

मारुतीरायाने शनीला समजावले की आता ते ध्यान करत असल्याने त्यांना युद्ध करण्याची इच्छा नाही. शनीने त्यांचे ऐकले नाही आणि त्यांनी मारुतीरायाला युद्धासाठी आव्हान दिले. त्यानंतर मारुतीरायाने शनीला चांगलीच अद्दल घडवत पराभूत केले. बजरंग बलीच्या माराने शनीच्या संपूर्ण शरीरात वेदना व्हायला लागल्या. तेव्हा मारुतीरायाने शनीला शरीरावर चोळण्यासाठी तेल दिले. तेल लावल्यानंतर शनीचे दुखणे कमी झाले. तेव्हापासून शनीला तेल वाहण्याची परंपरा सुरु झाली.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *