१५ वर्षीय अल्पवयीन बलात्कार पीडितेने दिला मुलीला जन्म पण जात पंचायतीने टाकले वाळीत..

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील धोंडगीपाडा गावात घडलेले प्रकरण सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. या गावातील एका अल्पवयीन तरुणीवर पंचायत सदस्याच्या नातेवाइकानेच अत्याचार केला होता. या बलात्कार पीडितेने गर्भपात न करता एका मुलीला जन्म दिला आहे. ती बलात्कार होऊनही लढली पण तिला आता जातपंचायतीकडून त्रास झेलावा लागत आहे.

कारण, या गावात जात पंचायतीने एका १५ वर्षीय अल्पवयीन बलात्कार पीडितेला कुटुंबासह वाळित टाकले आहे. या मुलीच्या गर्भात वाढणारे अर्भक गोळ्या घेऊन पाडावे, असा पंचायतीचा आदेश होता. परंतु, पीडितेसह तिच्या कुटुंबीयांनीही यास नकार दिला. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर या जात पंचायतीने पीडित कुटुंबावर ११ हजार रुपयांचा दंडही आकारला. यामुळे पीडितेचे हाल सुरू आहेत.

काय आहे प्रकरण-

साक्री तालुक्यात धोंडगीपाडा या गावातील पीडित कुटुंब राहते. पीडित मुलीचे आई वडील मोलमजुरी करतात. मोलमजुरीसाठी ते गुजरातला गेले होते. एप्रिलमध्ये ते परतले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपली मुलगी आठ महिन्यांची गरोदर आहे. एका पंचायत सदस्याच्या नातेवाईकाने मुलीवर अत्याचार केल्याचा पीडित कुटुंबाचा आरोप आहे.

जात पंचायतने अनेकदा छळ केल्याच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत. काहीही अजब निर्णय घेणे जातपंचायतींनी अनेकदा केले हे. जात पंचायत या कुटुंबाला न्याय देईल असे वाटले होते. न्यायाच्या अपेक्षेने ते जात पंचायतीकडे गेले होते. पण झाले उलटेच आणि जातपंचायतीने पीडितेला गर्भपात करण्यास सांगितले.

या कुटुंबाने न घाबरता पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पण पोलिसांनीही सुरुवातील टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. उलट ‘गावातील प्रकरण गावातच मिटवा’, असा सल्लाही पाेलिसांनी दिला. यावर सामाजिक कार्यकर्ते नवल ठाकरे यांनी हस्तक्षेप केला आणि १९ मे रोजी गुन्हा दाखल झाला. यानंतर जात पंचायत अधिकच भडकली. तक्रार परत घ्या किंवा ११ हजार दंड भरा, असे नवे फर्मान पंचायतीने काढले.

सध्या ही अल्पवयीन मुलगी धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात आहे. ३० मे रोजी तिने एका मुलीला जन्म दिला. पीडितेच्या आईने पाणावलेल्या डोळ्यांनी ही आपबीती सांगितली… “दोन महिन्यांपासून जात पंचायतीचे सदस्य गर्भपातासाठी दबाव टाकत होते. एक आई पूर्ण वाढलेल्या गर्भाचा जीव घेईल?’

या कुटुंबाला गावात छळलं जात आहे. गावात लोकं काहीही बोलत आहेत. तसेच त्यांना पाणीही भरू दिले जात नाही. पीठाच्या गिरणीवरही टाळाटाळ केली जात आहे. तसेच फोन करूनही धमक्या मिळत आहेत. त्यामुळे हे कुटुंब प्रचंड दहशतीखाली आहे. तसेच मुलीचा जवाब नोंदवण्यापासून नवजात मुलगी व आईचा डीएनए तपासणीपर्यंत टाळाटाळ केली जात आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *