नोटांवरील गांधीजी यांचे फोटो काढून टाका म्हणणाऱ्या निधी चौधरी आहेत तरी कोण?

नोटांवरून गांधीजींचा फोटो आणि जगभरातून त्यांचे पुतळे हटविण्याची मागणी करतानाच नथुराम गोडसेचं आभार मानणारं ट्विट केल्यामुले मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी वादात अडकल्या आहेत. त्यांच्यावर देशभरातून टीका होत आहे. त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी आपले ट्विट डिलीट करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे निधी चौधरी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही महात्मा गांधींविरोधात अवमानकारक ट्विट करणाऱ्या चौधरींना तात्काळ निलंबित करण्यात यावं, अशी मागणी केली आहे.

‘आपण महात्मा गांधी यांची १५० जयंती उत्साहात साजरी करत आहोत. नोटांवरून गांधीजींचा फोटो हटविण्याची हीच वेळ आहे. जगभरातील गांधीजींचे पुतळे हटविण्यात यावेत, संस्था आणि रस्त्यांना देण्यात आलेली त्यांची नावं हटविण्यात यावीत. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल. ३० जानेवारी १९४८ साठी थँक्यू गोडसे!’, असं वादग्रस्त ट्विट त्यांनी केलं होतं.

कोण आहेत निधी चौधरी-

निधी चौधरी या २०१२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून सध्या मुंबई महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून देखील काम पाहिले आहे. मूळच्या राजस्थानमधल्या नागौर जिल्ह्यातल्या डीडवानाच्या रहीवाशी असलेल्या निधी यांनी आएएस अधिकारी होण्यापूर्वी २००८ मध्ये रिझर्व्ह बँकेतही काम केले आहे.

त्यांनी जयपूरमधेच आपले उच्चशिक्षण घेतले. त्यांनी राजस्थान विद्यापीठातून लोकप्रशासन विषयात पी एचडी प्राप्त केलेली आहे. २०१७ मध्ये पालघर जिल्हा परिषदेच्या सीईओ असताना एका आंदोलनादरम्यान आंदोलकांनी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याचवेळी त्या चर्चेत आल्या. त्यानंतर माजी आमदारासह १७ जणांना अटक झाली होती.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *