छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्रीने लाईव्ह येऊन मागितली माफी

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने महान समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त मत मांडत सती प्रथेचे समर्थन केले होते.

एवढ्यावरच न थांबता पायल रोहतगी पुन्हा एकदा बरळली आहे. तिने आता महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकली आहे. तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवाजी महाराज हे मुळचे क्षत्रिय नसून ते शुद्र जातीत जन्माला आले होते, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. शिवाय मराठा आरक्षणावरही आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिले? असा थेट सवालही तिने केला आहे.

टीकेनंतर मागितली माफी-

पायल वर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर तिने आता फेसबुक लाईव्हद्वारे माफी मागितली आहे. तिच्या पोस्टमुळे अनेक मनं दुखावली होती.

काय होता वाद-

पायल हि तिच्या जुन्या पोस्टवरून नथुराम गोडसेची चाहती असल्याचे दिसते. तिने काही दिवसांपूर्वी नथुराम गोडसेची पाठराखण करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. कमल हसन यांनी नथुराम गोडसेला स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी असल्याचे म्हंटल्यानंतर तिने या वक्तव्याचा निषेध करणारी पोस्ट केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह पोस्टकेल्यानंतर तिच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. ट्विटर, इन्स्टाग्रामवर तिने स्वतःचे आणि पती संग्राम सिंगचे फोटो शेअर करत त्यावर कॅप्शनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे तसेच महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिलं असा प्रश्नही तिने विचारला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *