ट्रेनच्या मागे हे X का लिहिलेलं असतं? जाणून घ्या यामागचं कारण

ट्रेन हा अनेकांच्या आयुष्यातील एक महत्वाचा घटक असतो. अनेकदा ट्रेनने प्रवास करण्याचा योग आपल्याला येत असतो. काहींना तर रोजच ट्रेनने प्रवास करावा लागतो. तुम्हीहि बालपणापासून आतापर्यंत अनेकदा ट्रेनने प्रवास केला असेल आणि अजूनही करत असाल.

ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेक गोष्टींचे कुतूहल आपल्या मनात वाटते. ट्रेनमधून प्रवास करताना अनेकदा आत आणि बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे साइन पाहिले असतील. यातील एक महत्त्वाचं साइन म्हणजे ट्रेनच्या शेवटच्या डब्यामागे असलेलं X हे साइन. सर्वांच्या मनात अनेकदा हा प्रश्न आला असेल की, या X चा नेमका काय अर्थ असावा?

खासरेवर जाणून घेऊया या X चा नेमका अर्थ आहे तरी काय?

भारतात चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनच्या मागे हा X साइन तुमच्या नजरेस पडला असेल. सहसा पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगात X हा साइन काढलेला असतो. हा साइन सर्वच पॅसेंजर ट्रेनच्या मागे असणे गरजेचे आहे. हा नियम भारतीय रेल्वेनेच केला आहे. यासोबतच तुम्ही हे पाहिलं असेल की, काही ट्रेनवर एलव्ही असंही लिहिलं असतं. सोबतच ट्रेनच्या मागे लाल रंगाचा लाइटही ब्लिंक करत असतो.

ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर एलव्ही लिहिण्याचा अर्थ असा की, हा डबा ट्रेनचा शेवटचा डबा आहे. शेवटच्या डब्यावर हे लिहिणे बंधनकारक असते. आणि हा एलव्ही नेहमी X या साइनने लिहिला जातो. प्रत्येक ट्रेनच्या मागे X चा साइन हा कर्मचाऱ्यांसाठी संकेत असतो की, हा शेवटचा डबा आहे. जर एखाद्या ट्रेनच्या मागे असं लिहिलेलं नसेल तर याचा अर्थ हा होतो की, ट्रेन आपातकालिन स्थितीत आहे.

तसेच ट्रेनच्या मागे जळत असलेला लाल लाइट हा ट्रॅकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निर्देश असतो की, ट्रेन त्या ठिकाणाहून पास झाली आहे, जिथे ते काम करत होते. हा लाइट खराब वातावरणात कर्मचाऱ्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करतो. तसेच या लाइटने मागून येणाऱ्या ट्रेनला सुद्धा इशारा मिळतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *