मोदी मंत्रिमंडळातील हे आहेत सर्वात तरुण मंत्री आणि सर्वात वयोवृद्ध मंत्री..

नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटली आणि सुषमा स्वराज नसतील तर अमित शहा यांचा समावेश असणार आहे. अमित शहा यांना अर्थमंत्रिपद मिळू शकेल, अशी जोरदार चर्चा आहे. शपथविधी आधी मोदींनी गुरुवारी (30 मे) शहिदांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी आणि अटलजींच्या स्मृतीस्थळालाही अभिवादन केले.

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सुषमा स्वराज या सर्वात तरुण मंत्री ठरल्या आहेत तर लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष असलेले ७२ वर्षीय रामविलास पासवान हे सर्वात वयोवृद्ध मंत्री आहेत.

नरेंद्र मोदी हे एकमेव असे पंतप्रधान ठरले आहेत जे ३ वेळा मुख्यमंत्री राहिले आणि २ वेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, सदानंद गौडा, निर्मला सीतारमन यांच्यासह 58 मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली.

नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर शहिदांना आदरांजली वाहिली. यावेळी लष्कर प्रमुख बिपीन रावत, नौदल प्रमुख सुनिल लांबा आणि हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल राकेश सिंह भदुरिया उपस्थित होते.

राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजता विविध पक्षांचे दिग्गज नेते, कलाकार, उद्योगपती यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा रंगला. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंह, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यासारख्या नेत्यांसह अंबानी कुटुंब, शाहरुख खान, करण जोहर, कंगना राणावत यासारखे कलाकार उपस्थित होते.

भारताच्या शेजारी राष्ट्रांचे प्रमुख, महासत्तांचे राजदूत, देशातील प्रमुख नेतेमंडळी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी यांच्यासह सुमारे ६ हजार पाहुणे या सोहळ्याला उपस्थित होते. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. परंतु, यावेळी SAARC ऐवजी BIMSTEC संघटनेतील राष्ट्रांच्या प्रमुखांनाच आमंत्रित केलं.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *