पद्मनाभ मंदिरातील खजिना माहिती असेल पण महाराष्ट्रातील हा गुप्त खजिना माहिती आहे का?

नेहमी प्रमाणे आम्ही आपल्या साठी आणली आहे खास बातमी तर जाणून घेऊया काय खास आहे तर. पद्मनाभस्वामी मंदिरात असलेल्या खजिन्याबाबत संपूर्ण भारताला माहिती झाली आहे आज आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील एका मंदिरात असलेल्या खजिन्याबाबत.

येथे आहे तो गुप्त खजिना-

कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात आहे तो खजिना. अब्जावधीचा हा खजिना असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले आहेत. या खजिन्यात अनेक दुर्मिळ जड जवाहरे, हिरे-माणिके, मोती-सोने,चांदी असल्याचं माहीती पुढे आली.

महालक्ष्मीचा सुवर्ण मुकुट, सोन्याची गदा,सोनसाखळी,सोन्याचे घुंगरू, हिरेजडित हार तसेच चांदीची तलवार आणि अनेक हिरे-मोत्यांची दागिने असल्याच समजत.

ज्येष्ठ इतिहास संशोधक यांच्या म्हणण्यानुसार या मंदिराला शिवाजी महाराज, जिजामाता, चालुक्य घराण्यातील राजे यांनी दान केले आहेत. हा खजिना जवळपास ३ वर्षांपूर्वी उघडला असून कडेकोट बंदोबस्तात CCTV कॅमेऱ्यात यांची मोजणी झाल्याचे समजते.यापूर्वी १९६२ मध्ये खजिना उघडण्यात आला होता.

काय आहे या मंदिरात खास-

१)मंदिरातील प्रशासनाने मोठ्या दाव्याने सांगितले आहे की मंदिरातील खांब कोणीही अद्याप मोजू शकले नाहीत.मंदीराच्या चारही बाजूनी दरवाजे असून त्याला असणारे खांब मोजण्यासाठी विज्ञानाला पण अपयश आले असल्याचे सांगितले.

२)शालिवाहन काळात या मंदिराची उभारणी करण्यात आली असून हे मंदिर जवळपास १८०० वर्षे जुने असल्याचे तेथील शिलालेखावरून माहीत पडते. आदी शंकराचार्यांनी येथील महालक्ष्मीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली होती. खूप मोठ्या परिसरात असलेले मंदिर २७ हजार स्क्वेअर फूट मध्ये पसरलेले आहेत.

३) ५१ शक्तीपीठ पैकी हे मंदिर एक आहे.वर्षांतुन एक वेळा मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात.किरणोत्सव खूप प्रसिद्ध आहे.दिवाळीला होणाऱ्या महाआरतीला मागितलेली इच्छा पूर्ण होत असल्याची आख्यायिका आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *