सिनेमात दशतवाद्यांची भूमिका करणारे दोन कलाकार त्याच वेशात बाहेर पडले आणि घडलं असं काही..

मुंबईच्या वसई परिसरात एक धक्कादायक घटना घडली. इथे लोकांना दोन युवक दिसले. दोघेही सिगारेट खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांच्या अंगावर असलेले कपडे आणि त्यांचा वेष थोडा सर्वाना धक्का देणारा होता. त्यांच्या अंगावर बुलेटप्रूफ जॅकेट होतं. त्यांचा पेहराव बघून ते दहशतवादी वाटत होते.

त्यांना बघून मार्केटमध्ये गोंधळ उडाला. लोकं घाबरले आणि इकडे तिकडे पळायला लागले. कोणीतरी पोलिसांना देखील कॉल केला. पोलिसांना दहशतवादी घुसल्याचे सांगितल्याने पोलिसही क्षणाचाही विलंब न करता मोठ्या फौजफाट्यासह तिथे पोहचले. पोलिसांनी तब्बल दोन तास सर्च ऑपरेशन करून त्यांना अटक केली.

पण त्यांना अटक केल्यानंतर पोलिसही हैराण झाले असतील. कारण अटक करण्यात आलेले ते दोन व्यक्ती हे दोन सिने कलाकार होते. सेटवर शिल्लकच असणारे कलाकार असतात ना त्याच प्रकारचे हे दोन कलाकार होते. रितिक रोशन आणि जॅकी श्रॉफ यांच्या एका सिनेमाचं शूटिंग तिथं चालू होतं. या सिनेमात हे दोघे दशतवाद्याच्या भूमिकेत होते.

सेटवर थोडा टाइम मिळाला तर ते दोघे त्याच वेशात बाहेर सिगारेट घ्यायला गेले. पण त्यांना कुठे माहिती होते कि आपल्या या वेश्यामुळे आपल्याला संकटांचा सामना करावा लागू शकतो. लोकांनी त्यांना खरेखुरे दहशतवादी समजले.

दोघांपैकी एकाचं नाव बलराम गिनवाला तर दुसऱ्याच नाव अरबाज खान आहे. त्यांना अटक झाल्यानंतर फिल्म प्रोडक्शनचे लोकं पोलीस स्टेशनमध्ये पोहचले. त्यांनी काही कागदपत्रे दिल्यानंतर ते दोघे कलाकार असल्याचं सिद्ध झालं आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

त्यांची सुटका झाली असली तरी ते दोघे आणि प्रोडक्शन युनिटचा प्रमुख अशा तिघांवर पोलिसांनी शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *