भाजपच्या या नेत्याचे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले अभिनंदनाचे बॅनर!

लोसभा निवडणुकीत भाजपने देशभरात दणदणीत यश मिळवले. महाराष्ट्रातही भाजपला निर्विवाद यश मिळवता आले. आज मोदी सरकारचा शपथविधी सोहळा दिल्लीत पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होणार आहे. महाराष्ट्रात पुढील सहा महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन केंद्रात प्रतिनिधित्व दिले जाणार असल्याची शक्यता आहे.

तसेच लाेकसभा निवडणुकीनंतर राज्यातही खांदेपालटाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. मोदींच्या विश्वासातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

फडणवीस यांना राज्यातच राहून काम करायची इच्छा असल्याचे बोलले जाते. पण जर त्यांना केंद्रात संधी मिळाली तर अशा परिस्थितीत फडणवीस यांचे विश्वासू जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता त्यांचे कार्यकर्ते वर्तवत आहेत. किंबहुना, आता एकनाथ खडसेंपाठाेपाठ मंत्री महाजन जळगावात बॅनरवर मुख्यमंत्री म्हणून झळकले आहेत.

यापूर्वी महाराष्ट्रात अनेक नेते संभाव्य मुख्यमंत्री म्हणून बॅनरवर झळकत राहिले आहेत. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते त्यांना नेहमीच भावी मुख्यमंत्री म्हणून बघत आले आहेत. त्यात आता गिरीश महाजन यांचे नाव जोडले गेले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जळगावात बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे.

केंद्रात अरुण जेटली, सुषमा स्वराज यांनी आरोग्याच्या कारणामुळे मंत्रिमंडळात समावेश न करण्याची मोदींना विनंती केली आहे. अशावेळी पंतप्रधान मोदींना केंद्रात रिक्त हाेणाऱ्या अरुण जेटलींच्या जागी अनुभवी सहकाऱ्याची आवश्यकता भासणार आहे. अशा परिस्थितीत माेदी फडणवीसांच्या नावाचा विचार करू शकतात.

त्यामुळे फडणवीसांच्या विश्वासातील सहकाऱ्याला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या फडणवीस अत्यंत निकटवर्तीय म्हणून महाजनांचे नाव घेतले जाते. त्यामुळे महाजनांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते, असा विश्वास त्यांचे जळगावातील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

त्याच जाेरावर कार्यकर्त्यांनी बुधवारी महापालिकेच्या सतरा मजली इमारतीसमाेर भले मोठे बॅनर लावले. त्यावर मंत्री महाजन यांना शुभेच्छा देत त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आहे. जळगावात लावलेल्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *