दोन वधुंनी एका वरासोबत मोठ्या थाटामाटात केलं लग्न ! वाचा या लग्नाचं थक्क करणारं कारण..

प्रेमात सर्व काही गौण असत,माणूस प्रेमात जिंकण्यासाठी कुठलीही तडजोड करू शकतो. आपण याचे एकदम ताजे उदाहरण बघूया. हे अनोखे लग्न झाले आहे छत्तीसगढ मधील दन्तेवाडा जिल्ह्यातील मुचणार या छोट्याशा गावात. बिरबल नाग हे नवरदेवाचे नाव असून प्रतिभा नावाची नवरी होती.

संपूर्ण परिवारात व नातेवाईकांत उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते हे सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होते.या दरम्यान हिरो सारखी एंट्री झाली ती सुमनी नावाच्या तरुणीची. सुमनी आणि बिरबल याचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते.

सामान्यतः अशा प्रकरणांची समाजात खूप हेटाळणी व अपमानास्पद वागणूक होते पण हे परिवार त्याला अपवाद ठरले त्यांनी मनाचा मोठेपणा व उच्चप्रतीची समजदारी दाखवली. पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे बिरबलाची प्रतिभा आणि सुमनी यांचे बरोबर मोठ्या थाटात लग्न पार पडले.

अगदी लग्न लागायच्या वेळेवर हजर झाली प्रेयसी

असं माहिती झालं कि बिरबल आणि सुमनी हे लिव्ह इन मध्ये राहत होते.दोघेही लग्न करण्यास इच्छुक होते पण तेव्हा नेमका विरोध झाला. काही महिन्यांनी सुमनी घरी परतली, तिने वापस येण्यास इन्कार केला. तब्बल दोन वर्षानंतर बिरबल हा बारसूर चालकी पाडा येथील प्रतिभा बरोबर लग्न बेडीत अडकण्यास तयार झाला व लग्नाची तयारी करण्यास दोन्ही परिवार लागले. आणि त्यादरम्यान सुमनी परतली.

प्रकरण पोहोचले ठाण्यापर्यंत , त्यानंतर घडले असे…..

प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.ठाण्यात दोन्ही युवती आणि बिरबलाच्या परिवाराचे बोलणे झाले.दोन्ही युवतींनी बिरबल बरोबरच लग्न करण्याचे ठरविले. समाजातील नामांकित व्यक्तींनी सुद्धा त्यांच्या लग्नास दुजोरा दिला त्यानंतर त्यांचे लग्न मोठ्या थाटात पार पडले.

बिरबलाच्या वडिलांनी म्हटले कि आम्हास सुख-समाधान हवे ..

या लग्नामुळे कोणीही नाराज नसून बिरबल आणि दोन्ही नववधू अतिशय आनंदी आहेत,त्यांचे नातेवाईक सुद्धा आनंदी आहेत. बिरबलचे वडील चन्नीराम यांनी मुलाच्या यानिर्णयावर खुश असल्याचे सांगत निर्णयाचे स्वागत केले. त्यांचे असे म्हणणे आहे कि घरात सुख-शांती असल्यावर दुसरे अजून कोणते सुख पाहिजे…!!

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *