नवनिर्वाचित खासदार नवनीत राणांची आमदार नवऱ्यासोबत शहरात बाईकराईड! बघा व्हिडीओ..

लोकसभा निवडणुकीत युवा स्वाभिमानी आघाडीच्या नवनीत कौर राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत संसदेत एन्ट्री मिळवली. त्यादिवसापासून नवनीत कौर राणा चर्चेत आहेत. आनंदराव अडसूळ यांचं नाव केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चेत होतं. नवनीत राणा त्यांचा पराभव करून जायंट किलर ठरल्या आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अडसूळ यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला होता. २०१४ च्या पराभवाचा बदलाच एकप्रकारे राणा यांनी घेतला आहे.

त्यांच्या या विजयानंतर मोठ्या रॅली आणि विजयी मिरवणूका कार्यकर्ते काढत आहेत. आता नवनीत कौर राणा यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. २३ मे रोजी निकालानंतर पती आमदार रवी राणा आणि नवनीत कौर राणा यांचा बाईकवर फिरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

निकालाच्या दिवशी नवनीत कौर राणा आणि रवी राणा बाईकवरुन आपल्या घरापासून ते बडनेरा रोड येथील निमानी गोडाऊन येथील मतमोजणी केंद्रावर रात्री १० वाजता बाईकवर जाऊन सर्टिफिकेट घेतलं. त्यावेळी त्यांच्याभोवती बाईकवर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचा गराडा होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *