सोशल मिडीयावरील ‘जेसीबी की खुदाई’ ट्रेण्ड नेमका कसा सुरु झाला?

सोशल मिडीयावर कधी काय ट्रेण्ड सुरु होईल सांगता येत नाही. सोशल मीडिया हि अशी गोष्ट आहे जी रातोरात एखाद्याला हिरो करू शकते तर एखाद्याला रातोरात झिरो करू शकते. आजपर्यंत आपण अनेकांना रात्रीत सुपरस्टार झालेलं बघितलं आहे. सोशल मीडियावर हाच प्रकार आता जेसीबीसोबत झाला आहे. सध्या ट्रेण्ड होत असलेलं #JCBKiKhudai तुम्हाला सोशल मीडियावर चक्कर मारल्यानंतर सर्वत्र दिसेल.

गेल्या २-३ दिवसांत सोशल मिडीयावर ‘जेसीबी की खुदाई’ या हॅशटॅगचे मिम्स मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत. परंतू हे मिम्स नेमके कशामुळे शेअर हो-त आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. फेसबुक आणि ट्विटरवर अनेकांनी याबाबत पोस्ट केल्या आहेत. परंतू या मिम्सची सुरुवात नेमकी कशामुळे झाली याचा शोध घेण्याचा अनेकांचा प्रयत्न सुरु आहे. खासरेवर जाणून घेऊया कसा सुरु झाला हा #JCBKiKhudai ट्रेंड.

मागील २-३ दिवसात फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर जेसीबीशी निगडित मिम्स बघून तुम्ही कदाचित वैतागलाही असाल. रोज जिकडे तिकडे जेसीबी दिसत आहेत. पण हा ट्रेंड नेमका कसा आला याचं उत्तर शोधलं असता ते हैद्राबाद मध्ये घेऊन जातं. ‘जेसीबी की खुदाई’ या ट्रेण्डची सुरुवात हैदराबादमधून झाल्याचं समजतंय.

हैदाराबादमधील एका खासदाराच्या एका वक्तव्यानंतर हा ट्रेंड सुरु झाल्याचं बोललं जात आहे. या खासदाराने म्हंटलं होतं कि “भारतीय लोक एवढे बेरोजगार आहेत कि त्यांच्याकडे वेळच वेळ असतो. एवढा रिकामा वेळ असतो कि एखाद्या ठिकाणी जेसीबीचं काम सुरु असेल तर लोक ते देखील पाहत बसतात”. या वक्तव्यानंतर हा ट्रेंड सुरु झाला आहे.

फेसबुकवर असलेल्या काही मोठ्या ग्रुप्सवर हे मिम्स सुरुवातील शेअर झाले. त्यानंतर मोठ्या पेजेसवर हे मिम्स शेअर झाल्याने देशभरातच हा ट्रेंड सुरु झाला.

या ट्रेंडनंतर जेसीबीने देखील एक पोस्ट शेअर करून जेसीबीवरील प्रेमासाठी सर्वांचे आभार मानले आहेत. ‘भारतीय लोकांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहोत’, असं ट्वीट जेसीबी कंपनीकडून करण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर ट्रेंड झालेले काही मिम्स बघूया-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *